एक्स्प्लोर

Corona Vaccine | कोविशिल्डच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी द्या; सीरम इन्स्टिट्यूटची केंद्र सरकारकडे मागणी

Corona Vaccine : Pfizer पाठोपाठ Covishield लसीच्या आपत्कालीन वापरासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने परवानगी मागितली आहे. कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागणारी सीरम ही देशातील पहिली कंपनी आहे.

Corona Vaccine : ऑक्सफर्डच्या कोरोना लसीच्या वापरासाठी परवानगी देण्याची मागणी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनं डीसीजीआयकडे केली आहे. कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागणारी सीरम ही देशातील पहिली कंपनी आहे. ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सीरम इन्स्टिट्यूटमध्ये सध्या सुरुवात झाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने महामारी दरम्यान, विस्तृत स्तरावर वैद्यकीय गरजा आणि जनहित यांचा हवाला देत सीरमने कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. याआधी शनिवारी अमेरिकी औषध निर्माती कंपनी फायझरने केंद्र सरकारकडे भारतात लसीकरणासाठी परवानगी मागितली आहे.

गेल्याच आठवड्यात फायझरला ब्रिटन आणि बहारीनने लसीकरणाला परवानगी दिली आहे. पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये या लसीच्या वापराला सुरुवात होत आहे. आता या कंपनीने भारतात लसीकरणासाठी तात्काळ परवानगी मागितली आहे. याला भारत सरकार कसा प्रतिसाद देतो ते पहावं लागेल. तसेच एसआयआयने आयसीएमआरसोबत एकत्र येऊन रविवारी देशाच्या विविध भागांत ऑक्सफर्डच्या कोविड-19ची लस 'कोविशील्ड'च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचं परीक्षण केलं.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अधिकृत सुत्रांनी माहिती दिली की, एसआयआयच्या अर्जाचा हवाला देऊन ते म्हणाले की, कंपनीने सांगितलं आहे की, क्लिनिकल परीक्षणाच्या चार डेटामध्ये हे समोर आलं आहे की, कोविशिल्ड कोरोनाची लक्षण असणाऱ्या रुग्णांमध्ये खासकरुन कोरोनाच्या गंभीर रुग्णांमध्ये खास प्रभावी ठरते. चारपैकी दोन चाचण्यांचा डेटा ब्रिटन आणि एक-एक भारत आणि ब्राझीलशी संबंधित आहे.

काय आहे लसीचं इमर्जेंसी अप्रूवल?

आपातकाली वापरासाठी परवानगी म्हणजेच, इमर्जेंसी यूज अथॅराइजेशन. वॅक्सिन आणि औषधं, तसेच डायग्नोस्टिक टेस्ट्स आणि मेडिकल डिव्हाइजेसच्या वापरासाठी परवानगी मागितली जाते. भारतात यासाठी सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशन (CDSCO) रेगुलेटरी बॉडी आहे. वॅक्सिन आणि औषधांसाठी हे अप्रूवल, त्यांची सुरक्षितता आणि त्यांचा परिणामांचं निरिक्षण करुन दिलं जातं. यासाठी क्लिनिकल ट्रायलचा डेटा तपासण्यात येतो. साधारणतः कोणत्याही लसीला मंजुरी मिळण्यासाठी अनेक वर्ष लागतात. आतापर्यंतचा सर्वात कमी अप्रूवल टाइम साडेचार वर्षांचा आहे. आपातकालीन परिस्थितीत जसं आता आहे, जगभरातील देशांमध्ये अशी व्यवस्था आहे की, औषध आणि लसीचे परिणाम उत्तम असतील तर त्यांना मंजूरी देण्यात येऊ शकते. अंतिम अप्रूवल संपूर्ण डेटाचं परिक्षण केल्यानंतर मिळतं.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CSK vs RCB : आरसीबीसाठी करो या मरो, चेन्नईबरोबर फायनलसाराखा सामना
CSK vs RCB : आरसीबीसाठी करो या मरो, चेन्नईबरोबर फायनलसाराखा सामना
माता न तूं वैरिणी! आईच्या संमतीने नराधमाकडून सातवीतील मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वडिलांचीही साथ
आईच्या संमतीने नराधमाकडून सातवीतील मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वडिलांचीही साथ; न्यायालयाकडून मिळाला न्याय
डोळ्यात पाणी... अवकाळीने गावकरी त्रस्त, प्रशासन मतदानात व्यस्त; पालघरमध्ये शेकडो कुटुंब उघड्यावर
डोळ्यात पाणी... अवकाळीने गावकरी त्रस्त, प्रशासन मतदानात व्यस्त; पालघरमध्ये शेकडो कुटुंब उघड्यावर
तुमच्याकडे 'हे' Android स्मार्टफोन असतील तर त्यात Google Wallet चालणार नाही, सुरक्षेच्या मुद्द्यावरून गुगलचा मोठा निर्णय
तुमच्याकडे 'हे' Android स्मार्टफोन असतील तर त्यात Google Wallet चालणार नाही, सुरक्षेच्या मुद्द्यावरून गुगलचा मोठा निर्णय
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amol Mitkari on Ajit Pawar : अजितदादा सक्तीच्या विश्रांतीवर, अमोल मिटकरी काय म्हणाले? ABP MajhaMumbai Clean Up Marshal : मुंबईमध्ये क्लीन अप मार्शलच्या नावावर लूट, 'एबीपी माझा'ने रंगेहाथ पकडलंKolhapur Hoardings Action : कोल्हापुरात पालिकेला आली जाग, 25 अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईUddhav Thackeray On Raj Thackeray : राज ठाकरे यांच्याबाबत प्रश्न, उद्धव ठाकरेंनी बोलणं टाळलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK vs RCB : आरसीबीसाठी करो या मरो, चेन्नईबरोबर फायनलसाराखा सामना
CSK vs RCB : आरसीबीसाठी करो या मरो, चेन्नईबरोबर फायनलसाराखा सामना
माता न तूं वैरिणी! आईच्या संमतीने नराधमाकडून सातवीतील मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वडिलांचीही साथ
आईच्या संमतीने नराधमाकडून सातवीतील मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वडिलांचीही साथ; न्यायालयाकडून मिळाला न्याय
डोळ्यात पाणी... अवकाळीने गावकरी त्रस्त, प्रशासन मतदानात व्यस्त; पालघरमध्ये शेकडो कुटुंब उघड्यावर
डोळ्यात पाणी... अवकाळीने गावकरी त्रस्त, प्रशासन मतदानात व्यस्त; पालघरमध्ये शेकडो कुटुंब उघड्यावर
तुमच्याकडे 'हे' Android स्मार्टफोन असतील तर त्यात Google Wallet चालणार नाही, सुरक्षेच्या मुद्द्यावरून गुगलचा मोठा निर्णय
तुमच्याकडे 'हे' Android स्मार्टफोन असतील तर त्यात Google Wallet चालणार नाही, सुरक्षेच्या मुद्द्यावरून गुगलचा मोठा निर्णय
सिनेस्टाईल भुगा... बुलडोझर खाली चिरडल्या 1 कोटी 35 लाखांच्या दारू बाटल्या, पोलीस कारवाई व्हायरल
सिनेस्टाईल भुगा... बुलडोझर खाली चिरडल्या 1 कोटी 35 लाखांच्या दारू बाटल्या, पोलीस कारवाई व्हायरल
कानून के हात बहुत लंबे होते है...  घाटकोपर बॅनर दुर्घटनेतील मुख्य आरोपी भिंडेला राजस्थानमधून अटक
कानून के हात बहुत लंबे होते है... घाटकोपर बॅनर दुर्घटनेतील मुख्य आरोपी भिंडेला राजस्थानमधून अटक
Swati Maliwal : मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या 'त्या' संपूर्ण घटनेचा जबाब खा. स्वाती मलिवाल यांनी नोंदवला, दिल्ली पोलिसांचा तपास सुरू
मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या 'त्या' संपूर्ण घटनेचा जबाब खा. स्वाती मलिवाल यांनी नोंदवला, दिल्ली पोलिसांचा तपास सुरू
Ajit pawar, Nitish Kumar : महाराष्ट्रात अजितदादांची अन् बिहारमध्ये नितीशकुमारांची अचानक गायब होण्याची चर्चा रंगली! तिकडं ममता बॅनर्जी पाठिंब्याबाबत बोलल्या
महाराष्ट्रात अजितदादांची अन् बिहारमध्ये नितीशकुमारांची अचानक गायब होण्याची चर्चा रंगली!
Embed widget