(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Vaccine | रशियात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात; डॉक्टर आणि आरोग्यसेवकांना लसीचा पहिला डोस
Corona Vaccine : 'Sputnik V' या रशियाच्या कोरोना लसीच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. डॉक्टर आणि आरोग्यसेवकांना लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात करणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला आहे.
Corona Vaccine : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. जगभरात लाखो लोकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. अशातच संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे ते कोरोनावरील प्रभावी लसीकडे. जगभरातील अनेक देश कोरोनावरील प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच अनेक लसींची चाचणी ही अंतिम टप्प्यात आहे. रशियाने मात्र सर्वात आधी कोरोनावरील प्रभावी लस 'Sputnik V' तयार केल्याचा दावा केला होता. आता रशियाने लसीकरणालाही सुरुवात केली आहे.
कोरोना लसीच्या लसीकरणात रशियाने आघाडी घेतली आहे. रशियामध्ये प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात झाली आहे. 'Sputnik V' या रशिया निर्मीत कोरोना लसीचा डोस रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये देण्यात येत आहे. डॉक्टर, आरोग्यसेवक अशा हायरिस्क वर्गात मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य दिलं जात आहे. लसीकरणासाठी मॉस्कोमध्ये शनिवारी 70 लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली आहेत.
'Sputnik V' लसीचा प्रयोग
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियामध्ये लसीकरण करताना ज्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. अशा लोकांना प्राधान्य दिलं जात आहे. Sputnik V लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, ही लस कोरोनावर 95 टक्के प्रभावी आहे. तसेच या लसीचे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम नाहीत.
दरम्यान, सकारात्मक परिणामांनंतरही लसीचं सामूहिक परीक्षण अद्याप सुरु आहे. हजारो लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. मॉस्कोचे मेयर संगेई सोबयानिन म्हणाले की, ही लस सर्वात आधी शाळेतील कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आमि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध करण्यात येईल. सर्व रुग्णांना 21 दिवसांच्या अंतराने लसीचे दोन डोस देण्यात येणार आहेत.
पुतिन यांच्या मुलीनेही घेतली लस
'Sputnik V' विकसित करणाऱ्या वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, ही लस 95 टक्के प्रभावी आहे. तसेच याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. परंतु, सकारात्मक परिणामांनंतरही या लसीचं सामूहिक परीक्षण सुरु आहे. रशियाने दावा केला आहे की, 'स्पुतनिक व्ही' ही जगातील पहिली नोंदणीकृत लस आहे. कारण सरकारने ऑस्ट महिन्यातच याला मंजुरी दिली होती.' दरम्यान, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून रशियाने लसीला मंजूरी दिल्यानंतर टीका केली जात होती. त्यावर बोलताना राष्ट्रपती पुतिन म्हणाले की, त्यांच्या मुलीनेही सुरुवातीलाच या लसीचा डोस घेतला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- ब्रिटनमध्ये Pfizer-BioNTech लसीच्या वापराला मंजुरी, परवानगी देणारा जगातील पहिलाच देश
- Corona Vaccine | संपूर्ण देशात लसीकरण करु असं म्हटलं नव्हतं : सरकार
- कुणी कितीही मागणी केली तरी कोरोना सेवकांनाच प्रथम लस देणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे
- सीरमची लस असुरक्षित असल्याचा चेन्नईच्या स्वयंसेवकाचा आरोप; सीरमने आरोप फेटाळले, 100 कोटींचा दावा