(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Vaccination : कोरोना लसींच्या 100 कोटी डोसचा टप्पा उद्या पूर्ण होणार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
100 कोटी लसीकरणाचा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने जय्यत तयारी केली आहे. आरोग्य मंत्रालयानं सेलिब्रेशनची तयारी केली आहे.
मुंबई : देशात आज 100 कोटी लसवंतांचा टप्पा पूर्ण होण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात 99 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. दरम्यान येत्या एक किंवा दोन दिवसांत 100 कोटी टप्पा पूर्ण होणार असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. 100 कोटी लसीकरणाचा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने जय्यत तयारी केली आहे
आत्तापर्यंत 99 कोटी 12 लाख कोरोना प्रतिबंधक लशीचे डोस देण्यात आले आहेत. हाच वेग कायम राहिल्यास 100 कोटी डोसचा टप्पा उद्या पूर्ण होण्याची शक्यता आहे. 100 कोटी लसीकरणाचा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने जय्यत तयारी केली आहे. आरोग्य मंत्रालयानं सेलिब्रेशनची तयारी केली आहे. देशातल्या 100 ऐतिहासिक वास्तूंना तिरंग्याच्या रुपात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. औरंगाबादचा बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, पुण्यातील शनिवार वाडा, आगाखान पॅलेस आणि मुंबईतल्या सीएसएमटीला रोषणाई करण्यात येणार आहे.
लसीकरणाचे टप्पे कसे पार पडले?
- 16 जानेवारी 2021- लसीकरण सुरु
- 1 फेब्रुवारी 2021- 1 कोटी डोस
- 15 जून 2021 - 25 कोटी डोस
- 6 ऑगस्ट 2021 - 50 कोटी डोस
- 1 सप्टेंबर 2021- 75 कोटी डोस
देशातील लसीकरणाच्या 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडल्यानंतर त्याचं यश साजरं करण्यासाठी केंद्र सरकारने जय्यत तयारी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कैलाश खेर यांच्या आवाजात एक थीम सॉंग लाँच केलं जाणार आहे. लसीकरणाने 100 कोटींचा आकडा ओलांडताच हे थीम साँग देशभरातील सार्वजनिक ठिकाणी जसं की रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, विमानतळ, बस स्टँडवर ऐकायला मिळणार आहे.या थीम साँगबद्दल बोलताना गायक कैलास खेर म्हणाले की, "लसीबाबत देशातील अनेक नागरिकांमध्ये अजूनही निरक्षरता आणि चुकीची माहिती आहे. या थीम साँगच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल."
संबंधित बातम्या :