Corona Cases Today : देशात आजही रुग्णसंख्या 40 हजारांच्या वर; 1206 जणांचा मृत्यू
Corona Updates in India : देशातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या ही पाच लाखांच्या आत आली असून सध्या 4 लाख 55 हजार 33 सक्रिय रुग्णसंख्या आहे.
नवी दिल्ली : देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाची रुग्णसंख्या 40 हजारांच्या वर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 42,766 नवीन रुग्णांची भर पडली आहे तर 1206 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल एकाच दिवशी 45,254 लोक कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. त्या आधी काल 43,393 नव्या रुग्णांची भर पडली होती तर 911 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
#CoronaVirusUpdates:
— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) July 10, 2021
📍Total #COVID19 Cases in India (as on July 10th, 2021)
▶97.20% Cured/Discharged/Migrated (2,99,33,538)
▶1.48% Active cases (4,55,033)
▶1.32% Deaths (4,07,145)
Total COVID-19 confirmed cases = Cured/Discharged/Migrated+Active cases+Deaths#StaySafe pic.twitter.com/rumasvpigS
आजचा सलग 32 वा दिवस आहे ज्यामध्ये देशातील कोरोनाची रुग्णसंख्या ही एक लाखांहून कमी आली आहे. कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या ही पाच लाखांच्या आत आली आहे. सध्या देशात 4 लाख 55 हजार 33 सक्रिय रुग्णसंख्या आहे. आतापर्यंत देशात 4 लाख 7 हजार 145 मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत तीन कोटी 7 लाख 95 हजार 716 लोक कोरोनाबाधित झाले आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 37 कोटी 21 लाख कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. देशातील कोरोनाचा मृत्यू दर हा 1.32 टक्के इतका आहे तर बरे होण्याचे प्रमाण हे 97 टक्के इतके आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काही दिवसांपासून रोज 9 हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्ण वाढत आहेत. अशात शुक्रवारी 8,992 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 10 हजार 458 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 440 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.08 टक्के आहे.
राज्यात आज 200 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.03 टक्के झाला आहे. तब्बल 36 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख 12 हजार 231 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यवतमाळ (23), हिंगोली (86), गोंदिया (80) या तीन जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 16,636 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Sunil Gavaskar Birthday: 72 वर्षांचे झाले लिटल मास्टर, सुनील गावस्करांचे 'हे' विक्रम अजूनही अबाधित!
- Cyber Crime : कॅनडात नोकरी लावतो म्हणून 'जामतारा स्टाईल'ने महिलेस 15 लाखांचा गंडा, आरोपीला कोलकात्यातून अटक
- Petrol Diesel 10 July : पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरु, सर्वसामान्य हैराण; मुंबईत पेट्रोल 106 पार