(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Update | देशात एका दिवसात 56,110 रुग्ण बरे होण्याचा विक्रम, रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्क्यांच्या पार
भारताच्या 'टेस्ट, ट्रॅक, ट्रीट' पद्धतीमुळे चाचण्यांचा नवीन उच्चांक गाठला आहे, गेल्या 24 तासांत 7 लाख 33 हजार 449 चाचण्यात करण्यात आल्या आहेत. यामुळे आतापर्यंतच्या एकत्रित चाचण्यांची संख्या 2.6 कोटींपेक्षा अधिक झाली आहे.
नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत 56 हजार 110 एवढी आतापर्यंतची एका दिवसात बरे झालेल्या रुग्णांची संख्या नोंदवण्यात आली आहे. प्रतिबंध धोरणांची यशस्वी अंमलबजावणी, आक्रमक पावलं उचलत केलेल्या व्यापक चाचण्या आणि कोविडच्या गंभीर रुग्णांचे प्रमाणित वैद्यकीय व्यवस्थापन, या सर्वांचा हा एकत्रित परिणाम आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांच्या योग्य समन्वयामुळे रुग्ण बरे होण्याचे दैनंदिन प्रमाण सातत्याने वाढत आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बरे होणाऱ्या रुग्णांची दररोजची संख्या 15000 होती. ती ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 50 हजार पेक्षा अधिकवर पोहचली. जास्त रुग्ण बरे होत असल्यामुळे आणि रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्यामुळे आणि गृह अलगीकरण (सौम्य लक्षणे असलेले रुग्ण), यामुळे बरे झालेल्या रुग्णांच्या एकूण संख्येने 16 लाखांचा टप्पा ओलांडला आहे, त्यांची संख्या आता 16 लाख 39 हजार 599 एवढी आहे. रुग्ण बरे होण्याच्या दराने 70.38 टक्के हा नवा उच्चांक गाठला आहे.
एकूण रुग्णांपैकी सक्रीय रुग्णांची संख्या (6,43,948) म्हणजे केवळ 27.64 टक्के आहे. ते सध्या वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, त्यामुळे बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय कोविड-19 रुग्ण यांच्यातील अंतर वाढून, सुमारे 10 लाख एवढे झाले आहे. रुग्णालयातील सुधारित आणि परिणामकारक वैद्यकीय उपचारपद्धती, रुग्णालयात रूग्णांना आणण्यासाठीची रुग्णवाहिका सेवा सुधारुन अधिक समन्वय आणणे आणि कोविडच्या रुग्णांना तात्काळ उपचार मिळतील, अशी व्यवस्था करणे, अशा उपाययोजना सातत्याने केल्या गेल्या. परिणामी, कोविडचा मृत्यूदर, जागतिक मृत्यूदराच्या तुलनेत सातत्याने कमी राहिला आहे. आज हा दर 1.98 टक्के एवढा आहे.
भारताच्या 'टेस्ट, ट्रॅक, ट्रीट' पद्धतीमुळे चाचण्यांचा नवीन उच्चांक गाठला आहे, गेल्या 24 तासांत 7 लाख 33 हजार 449 चाचण्यात करण्यात आल्या आहेत. यामुळे आतापर्यंतच्या एकत्रित चाचण्यांची संख्या 2.6 कोटींपेक्षा अधिक झाली आहे. तर, प्रती दशलक्ष लोकांमागे चाचण्यांची संख्या 18 हजार 852 वर पोहचली आहे.
श्रेणीबद्ध आणि वाढत्या प्रतिसादामुळे देशभरात चाचण्यांचे जाळे विस्तारीत करण्यात आले. आज देशात एकूण 1421 प्रयोगशाळा आहेत, यापैकी 944 प्रयोगशाळा शासकीय तर 477 खासगी आहेत. यामध्ये रिअल- टाईम आरटी पीसीआर चाचणी प्रयोगशाळा: 724 (शासकीय: 431 + खासगी: 293) आहेत. ट्रूनॅट आधारीत प्रयोगशाळा: 584 (शासकीय: 481 + खासगी: 103) आहेत. तर सीबीएनएएटी आधारीत प्रयोगशाळा: 113 (शासकीय: 32 + खासगी: 81) आहेत.