(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Update India : गेल्या 76 दिवसांनंतर पहिल्यांदाच मृत्यूचा आकडा हजाराच्या आत, रुग्णसंख्याही घसरली
Corona Update : देशातील कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा 50 हजारांच्या आत आली आहे. गेल्या 24 तासात देशात 979 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत काहीशी घट होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 46,148 रुग्णांची भर पडली आहे तर 979 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 76 दिवसांनंतर पहिल्यांदाच कोरोनाच्या रुग्णांची मृत्यू संख्या ही हजाराच्या आत आली आहे. गेल्या 24 तासांत 58,578 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी रविवारी, 50,040 रुग्णांची भर पडली होती तर 1258 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन 5,72,994 वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 3,96,730 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी दर हा 96.80 टक्क्यांवर पोहोचला आहे.
लसीकरणाच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर
कोरोना लसीकरणाच्या बाबतीत आता भारताने अमेरिकेलाही मागे टाकत आघाडी घेतली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 32.36 कोटी कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. अमेरिकेत आतापर्यंत 32.33 कोटी डोस देण्यात आले आहेत.
देशातील आजची कोरोना स्थिती :
- एकूण कोरोनाबाधित : तीन कोटी दोन लाख 79 हजार 331
- कोरोनामुक्त रुग्णांचा एकूण आकडा : दोन कोटी 93 लाख 09 हजार 607
- एकूण सक्रिय रुग्ण : पाच लाख 72 हजार 994
- एकूण मृत्यू : तीन लाख 96 हजार 730
राज्यातील स्थिती
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यात रविवारी 9,974 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात आज 143 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. रविवारी 8,562 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात आतापर्यंत 57,90,113 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 95.91 टक्क्यावर गेला आहे. राज्याचा मृत्यूदर 2 टक्के आहे. राज्यात सध्या 1 लाख 22 हजार 252 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात कोल्हापुरात सर्वांधिक रुग्णांची नोंद झाली आहे, कोल्हापुरात 1525 रुग्ण तर धुळ्यात आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Professor Recruitment : पुढच्या आठवड्यापासून प्राध्यापक भरती सुरु, पहिल्या टप्प्यात 3074 प्राध्यापकांची भरती
- टीईटी परीक्षेसंबंधी मुंबई उच्च न्यायालयाकडून 89 याचिका निकाली, 25 हजारांपेक्षा अधिक शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार
- Nashik Igatpuri Rave Party : इगतपुरीतील रेव्ह पार्टीचा पर्दाफाश, मराठी बिग बॉस फेम हिना पांचाळसह 22 जण अटकेत