(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India Corona Cases : गेल्या 24 तासांत देशात 3.62 लाख रुग्ण कोरोनामुक्त; तर 4 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू
India Corona Cases : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. अशातच काल दिवसभरात देशात 3.11 लाख कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर चार हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
India Corona Cases : भारतात अद्याप कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. दररोज तीन लाखांहून अधिक नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. दैनंदिन मृतांचा आकडाही चार हजारांवर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 311,170 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3,62,437 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
15 मेपर्यंत देशभरात 18 कोटी 22 लाख 20 हजार 164 रुग्णांना कोरोना लस देण्यात आली आहे. तर काल (शनिवार) 17 लाख 33 हजार 232 लसीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत 31.48 कोटींहून अधिक रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तर काल शनिवारी 18 लाख कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्ह रेट 17 टक्के आहे.
देशातील आजची कोरोना स्थिती :
एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 46 लाख 84 हजार 77
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 7 लाख 95 हजार 335
एकूण सक्रिय रुग्ण : 36 लाख 18 हजार 458
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 70 हजार 284
देशाचा कोरोना मृत्यूदर 1.09 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रिकव्हरी रेट 83 टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगात अमेरिका, ब्राझीलनंतर कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.
राज्यात शनिवारी 34,848 नवीन रुग्णांची नोंद, तर 59,073 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीचा आलेख आता खाली उतरत आहे. शनिवारी राज्यातील आकडेवारी काहीसा दिलासादायक आहे. राज्यात आज 59 हजार 073 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 34 हजार 848 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 47 लाख 67 हजार 053 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 89.2% एवढे झाले आहे.
राज्यात काल 960 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.51% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 08 लाख 39 हजार 404 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 53 लाख 44 हजार 063 (17.33 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 34 लाख 47 हजार 653 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 28 हजार 727 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 4 लाख 94 हजार 032 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :