एक्स्प्लोर

पण कुटुंब मात्र अजूनही प्रतीक्षेतच, कोरोमंडल एक्सप्रेसच्या लोकोपायलटला घराची आस कायम

Odisha Tragedy: दोन जून रोजी ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघातामध्ये 291 लोकांचा मृत्यू झाला तर जवळपास 1100 लोकं गंभीर जखमी झाली. त्यावेळी गुनानिधी हे कोरोमंडलचे लोकोपायलट होते.

Odisha Tragedy: ओडिशामध्ये (Odisha) झालेल्या रेल्वे अपघाताला(Railway Accident) आज दोन आठवड्यापेक्षा अधिका काळ झाला आहे. आजही हा अपघात कसा झाला हा एकच प्रश्न लोकांच्या मनात सतावात आहे. या अपघातामध्ये 291 जणांनी आपले आयुष्य गमावले तर जवळपास 1100 पेक्षा अधिक लोकं या अपघातामध्ये जखमी झाली आहेत. परंतु हा अपघात जिथे झाला तिथून अवघ्या 150 किमी अंतरावर असलेल्या एका गावामध्ये एक कुटुंब आपल्या मुलाची वाट पाहत आहेत. हा मुलगा म्हणजे कोरोमंडल एक्सप्रेसचे लोकोपायलट गुणनिधी मोहंती आहेत. 

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ते अजूनही त्यांच्या घरी परतले नाही. त्यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अपघातानंतर अजूनही त्यांचा त्यांच्या मुलाशी संपर्क झालेला नाही. तसेच संपूर्ण गावीतील लोकं या अपघातासाठी त्यांच्या मुलाला जबाबदार धरत आहेत.' परंतु आता त्या दिवशी नेमकं काय झालं हे कसं ते सांगणार? असं देखील त्यांच्या वडिलांनी म्हटलं. 

2 जून रोजी खरगपूरहून भुवनेश्वरला जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस ओडिशातील बालासोर येथील बहंगा बाजार स्टेशनच्या लूप लाइनवर उभ्या असलेल्या मालगाडीला जाऊन धडकली. या अपघातानंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे काही डब्बे रुळावरून घसरले आणि शेजारील रेल्वे रुळावर जाऊन पडले. त्यानंतर त्या मार्गावरुन येणारी हावडा-यशवंतपूर एक्सप्रेसही या गाड्यांना जाऊन धडकली. अपघाताच्या वेळी गुणनिधी मोहंती कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये लोको पायलट होते.

लोको पायलट देखील झाले होते जखमी 

सायंकाळी 7 वाजता झालेल्या या अपघातात 291 जणांचा मृत्यू झाला होता तर 1100 हून अधिक लोक जखमी झाले होते. गुणनिधी मोहंती यांचाही जखमींमध्ये समावेश होता. त्यानंतर मोहंती यांना भुवनेश्वर येथील एएमआयआय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर या अपघाताच्या दिवसापासून ते आजच्या तारखेपर्यंत गुणनिधी यांचे कुटुंबिय त्यांच्या येण्याची वाट पाहत आहेत.  

हिंदूस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार गुणनिधी यांना चार ते पाच दिवसांपूर्वी रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. पण त्यांचे कुटुंबिय मात्र त्यांच्या येण्याची आस लावून बसले आहेत. त्यांच्या छोट्या भावाने सांगितले की, कोणाही आम्हाला आमच्या भावाविषयी माहिती दिली नाही, त्यामुळे ते अजूनही रुग्णालयात आहेत असंच आम्हाला वाटतयं. 

ओडिशातील बालासोर येथे 2 जून रोजी झालेल्या भीषण रेल्वे अपघाताची सीबीआयकडून चौकशी करण्यात येत आहे. तसेच सीबीआयच्या पथकाने अपघाताच्या स्थळी जाऊन त्या स्थळाची पाहणी केली आहे. सोबतच त्यांनी स्टेशनवरील सर्व उपकरणांची देखील तपासणी केली आहे.सीबीआयसह, रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) देखील या संदर्भात चौकशी करत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Odisha Train Accident : मृतांची संख्या वाढली, बिहारमधील 17 वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget