एक्स्प्लोर

Congress Agitation live Update : राहुल गांधींची ईडीकडून पहिल्या टप्प्यातील चौकशी पूर्ण

Congress Agitation live Update : काँग्रेस नेते राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. राहुल गांधी यांची ईडीकडून पहिल्या टप्प्यातील चौकशी पूर्ण झाली आहे.

Key Events
Congress workers agitation live in support of Rahul Gandhi slogans against BJP Congress Agitation live Update : राहुल गांधींची ईडीकडून पहिल्या टप्प्यातील चौकशी पूर्ण
Congress Agitation

Background

Congress Agitation : नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. त्यानंतर राहुल गांधी आज ईडीपुढं जबाब नोंदवणार आहेत. याविरोधात काँग्रस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. देशभरात राहुल गांधींच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रातही काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधींच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. नागपुरातही काँग्रेसने जोरदार आंदोलनाची जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, दिल्लीतही काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेसचे बडे नेते यामध्ये सहभागी झाले आहेत.

महाराष्ट्र काँग्रेसनेही याविरोधात जोरदार आंदोलन केलं आहे. सुनो तानाशाहा, तोतों से डरा न पाओगे तुम हाथकंडों से हमें झुका ना पाओगे असे म्हणत भाजपविरोधी घोषणाबाजी केली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज ईडीसमोर (ED) आपला जबाब नोंदवणार आहेत. राहुल गांधी ईडीच्या कार्यालयाकडे रवाना झाले आहेत. या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांना ईडीनं पाठवलेल्या समन्स विरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते दिल्लीत मोर्चा काढणार होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या घरासमोर एक पोस्टर लावले आहे. हे पोस्टर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरवर 'सत्य झुकेगा नही'! असं लिहलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं नोटीस बजावली आहे. राहुल गांधी यांना यापूर्वी दोन जून रोजी चौकशीसाठी बोलावलं होतं. पण ते विदेश दौऱ्यावर असल्यामुळं त्यांनी ईडीकडं वेळ वाढवून मागितली होती. त्यानंतर ईडीनं त्यांना 13 जूनला हजर राहण्याचे निर्देश दिले होते. दुसरीकडे, सोनिया गांधी यांनाही ईडीनं नोटीस बजावली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ईडीसमोर उपस्थित राहण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. कारण त्यांना कोरोनाची लागण झाली असून अद्याप त्या कोरोनामुक्त झाल्या नाहीत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मनी लाँड्रिंग प्रकरणी राहुल गांधींना ईडीने पाठवलेले समन्स 'निराधार' आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांमध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत आणि ते केले जातील, असे चिदंबरम म्हणाले.

18:13 PM (IST)  •  13 Jun 2022

Aurangabad: औरंगाबादमध्ये काँग्रेसच्या समर्थनात राष्ट्रवादीच आंदोलन

Congress Agitation: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची आज ईडीकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीच्या निषेधार्थ आज औरंगाबादमध्ये काँग्रेसच्या समर्थनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आलं. शहरातील क्रांतीचौकात हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. केंद्र सरकार तपास संस्थांचा गैरवापर करत असल्याचं सांगत काँग्रेस विरोधात मुद्दामहून ईडीचा वापर केला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यापुढे ईडीचा असाच वापर सुरू राहील्यास रस्त्यावर उतरू असा ईशाराही आंदोलकांनी दिलाय. 

13:09 PM (IST)  •  13 Jun 2022

Mumbai Congress News : राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरोधात ईडीनं सुरू केलेल्या कारवाईचे मुंबईत तीव्र पडसाद

Mumbai Congress News : राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरोधात ईडीनं सुरू केलेल्या कारवाईचे मुंबईत तीव्र पडसाद पाहायला मिळाले. सीएसएमटी स्थानकाजवळील जीपीओ येऊन निघालेला काँग्रेसचा निषेध मोर्चा बलार्ड पिअरपर्यंत पोहचला. ईडी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हा मोर्चा अडवण्यात मुंबई पोलिसांना यश आलं. या मोर्चात काँग्रेसचे सारे जेष्ठ नेते आणि मंत्री सहभागी झाले होते. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, नसीम खान, भाई जगताप, चरणसिंह सप्रा हे नेते यात आघाडीवर होते. तसेच काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.
 
 
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget