एक्स्प्लोर
नोटाबंदीने अर्थव्यवस्थेचा कणा मोडला : राहुल गांधी
नवी दिल्ली: नरेंद्र मोदी आणि मोहन भागवतच देश चालवत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. काँग्रेसने दिल्लीत 'जनवेदना संमेलन' आयोजित केलं होतं. या संमेलनात राहुल गांधी यांनी मोदी, मोहन भागवत आणि भाजपवर हल्लाबोल केला.
मोदी सरकारनं आपलं अपयश लपवण्यासाठीच नोटबंदीचं थोतांड केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.
नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला. ऑटोमोबाईल क्षेत्रात भारताची अडीच वर्षातील स्थिती ही 16 वर्षे मागे गेली आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
देशात बेरोजगारी वाढत आहे. लोक शहरं सोडून गावाकडे जात आहेत. मोदींनी विचार न करता नोटाबंदीचा निर्णय घेतला, असा आरोपही राहुल गांधींनी केला.
याशिवाय काँग्रेसकडून रिझर्व्ह बँकेसह सर्व संस्थांचा नेहमीच आदर केला. मात्र मोदी सरकार अशा संस्थांना दुय्यम स्थान देत असल्याचं राहुल गांधी म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement