एक्स्प्लोर

Congress on PM Modi : जनतेचा तीव्र विरोध आणि विरोधकांनी पीएम मोदींना शिवरायांची माफी मागण्यास भाग पाडले; काँग्रेसचा हल्लाबोल

Congress on PM Modi : आपल्या अक्षम्य पापाबद्दल मोदी खरोखरच माफी मागत असतील तर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावरून दूर करावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

Congress on PM Modi : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लोकार्पण केल्यानंतर अवघ्या आठ महिन्यात कोसळल्यानंतर आज पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र दौऱ्यात माफी मागितली. या घटनेवर पंतप्रधान मोदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ आमच्यासाठी एक नाव नाही तर ते आमचे आराध्य दैवत आहेत. दरम्यान, मोदींनी माफी मागण्यावर काँग्रेसने हल्लाबोल केला आहे.

राजेंचा हा अपमान महाराष्ट्र विसरणार नाही आणि माफ करणार नाही

काँग्रेसने ट्विट करत म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील जनतेचा तीव्र विरोध आणि विरोधकांनी आज नरेंद्र मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागण्यास भाग पाडले. पण ही माफी नाही तर निमित्त आहे. आपल्या अक्षम्य पापाबद्दल मोदी खरोखरच माफी मागत असतील तर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावरून दूर करावे. तसेच या प्रकल्पात सहभागी असलेल्यांवर कडक कारवाई करा. राजेंचा हा अपमान महाराष्ट्र विसरणार नाही आणि माफ करणार नाही.

सावरकरांना शिव्या देणाऱ्यांसारखे आम्ही नाही

दरम्यान, पीएम मोदी म्हणाले की, आज मी माझे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो. आमची मूल्ये वेगळी आहेत, आम्ही ते लोक नाही जे या भूमीचे सुपुत्र, भारतमातेचे महान सुपुत्र वीर सावरकर यांचा अपमान करत राहतात. ते माफी मागायला तयार नाहीत, ते न्यायालयात जाऊन लढायला तयार आहेत.

शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत

पीएम मोदी पुढे म्हणाले की,आज या कार्यक्रमाबद्दल बोलण्यापूर्वी मला माझ्या मनातील भावना व्यक्त करायच्या आहेत. 2013 मध्ये भाजपने मला पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केल्यावर सर्वप्रथम मी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर बसून प्रार्थना करून त्यांचे आशीर्वाद घेतले. सिंधुदुर्गात नुकतेच जे काही घडले ते माझ्यासाठी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. आज मी माझ्या प्रिय देवाच्या चरणी मस्तक टेकून माफी मागतो.

पंतप्रधान मोदी यांनी आज पालघरमध्ये अनेक विकासकामांचा शुभारंभ केला. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात विकासाची क्षमता आणि आवश्यक संसाधने आहेत. येथे समुद्र किनारे देखील आहेत आणि या किनाऱ्यांवरून आंतरराष्ट्रीय व्यापाराचा शतकानुशतके जुना इतिहास आहे. येथे भविष्यासाठीही अपार शक्यता आहेत. या संधींचा महाराष्ट्र आणि देशाला पुरेपूर लाभ मिळावा यासाठी आज वाधवान बंदराची पायाभरणी करण्यात आल्याचे मोदी म्हणाले. हे देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असेल. हे केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात खोल बंदरांपैकी एक महत्त्वाचे बंदर असेल.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'बापाच्या हातात बंदूक होती,  मेडिकल कॉलेजमध्ये माझ्या डोळ्यादेखत नवऱ्याच्या छातीत गोळी घातली, तो क्षणात मांडीवर कोसळला' आंतरजातीय विवाह केलेल्या लेकीची भयावह कहाणी
'बापाच्या हातात बंदूक होती, हुडी घालून आला, मेडिकल कॉलेजमध्ये माझ्या डोळ्यादेखत नवऱ्याच्या छातीत गोळी घातली, तो क्षणात मांडीवर कोसळला' आंतरजातीय विवाह केलेल्या लेकीची भयावह कहाणी
BJP on Sharad Pawar : विधानसभेपूर्वी 160 जागा जिंकून देण्याची ऑफर, शरद पवारांच्या सनसनाटी दाव्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
विधानसभेपूर्वी 160 जागा जिंकून देण्याची ऑफर, शरद पवारांच्या सनसनाटी दाव्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मोठी बातमी! जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात तलाठी अन् महसूल कर्मचाऱ्यांच्या निलंबनंतर महसूल मंत्र्यांचा मोठा निर्णय
जालन्यात शेतकऱ्यांचा अतिवृष्टी अनुदानाचे पैसे लाटले, तलाठी महसूल कर्मचाऱ्यांच्या निलंबनानंतर बावनकुळेंचा मोठा निर्णय
Jalgaon Crime : एकनाथ शिंदेंचा पीए असल्याचं भासवत तब्बल 20 जणांना लाखोंना गंडवलं, जळगावातील दाम्पत्याचा कारनामा
एकनाथ शिंदेंचा पीए असल्याचं भासवत तब्बल 20 जणांना लाखोंना गंडवलं, जळगावातील दाम्पत्याचा कारनामा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'बापाच्या हातात बंदूक होती,  मेडिकल कॉलेजमध्ये माझ्या डोळ्यादेखत नवऱ्याच्या छातीत गोळी घातली, तो क्षणात मांडीवर कोसळला' आंतरजातीय विवाह केलेल्या लेकीची भयावह कहाणी
'बापाच्या हातात बंदूक होती, हुडी घालून आला, मेडिकल कॉलेजमध्ये माझ्या डोळ्यादेखत नवऱ्याच्या छातीत गोळी घातली, तो क्षणात मांडीवर कोसळला' आंतरजातीय विवाह केलेल्या लेकीची भयावह कहाणी
BJP on Sharad Pawar : विधानसभेपूर्वी 160 जागा जिंकून देण्याची ऑफर, शरद पवारांच्या सनसनाटी दाव्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
विधानसभेपूर्वी 160 जागा जिंकून देण्याची ऑफर, शरद पवारांच्या सनसनाटी दाव्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मोठी बातमी! जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात तलाठी अन् महसूल कर्मचाऱ्यांच्या निलंबनंतर महसूल मंत्र्यांचा मोठा निर्णय
जालन्यात शेतकऱ्यांचा अतिवृष्टी अनुदानाचे पैसे लाटले, तलाठी महसूल कर्मचाऱ्यांच्या निलंबनानंतर बावनकुळेंचा मोठा निर्णय
Jalgaon Crime : एकनाथ शिंदेंचा पीए असल्याचं भासवत तब्बल 20 जणांना लाखोंना गंडवलं, जळगावातील दाम्पत्याचा कारनामा
एकनाथ शिंदेंचा पीए असल्याचं भासवत तब्बल 20 जणांना लाखोंना गंडवलं, जळगावातील दाम्पत्याचा कारनामा
Kolhapur News: ऊसाच्या शेतात तीन महिन्यांचे मृत अर्भक पुरलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ
कोल्हापूर : ऊसाच्या शेतात तीन महिन्यांचे मृत अर्भक पुरलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ
Sangli News:विशाल पाटलांना सांगलीत धक्क्यावर धक्के सुरुच; चुलत वहिनींनंतर आता खंद्या समर्थकाने साथ सोडली! भाजप प्रवेश करणार
विशाल पाटलांना सांगलीत धक्क्यावर धक्के सुरुच; चुलत वहिनींनंतर आता खंद्या समर्थकाने साथ सोडली! भाजप प्रवेश करणार
Sharad Pawar and BJP: मतदानातील फेरफाराविषयी शरद पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट, भाजप नेते तातडीने प्रत्युत्तरासाठी मैदानात उतरले
मतदानातील फेरफाराविषयी शरद पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट, भाजप नेते तातडीने प्रत्युत्तरासाठी मैदानात उतरले
Kolhapur Circuit Bench: कोल्हापूर सर्किट बेंचसाठी लगीनघाई; पुढील तीन दिवसात इमारतीचे हस्तांतरण, पालकमंत्र्यांकडून कामकाजाची पाहणी
कोल्हापूर सर्किट बेंचसाठी लगीनघाई; पुढील तीन दिवसात इमारतीचे हस्तांतरण, पालकमंत्र्यांकडून कामकाजाची पाहणी
Embed widget