बाबरी मशीद प्रकरणी CBI कोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात : काँग्रेस
वादग्रस्त बाबरी मशीद प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने भाजपचे ज्येष्ठ नेचे लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियारसह सर्व 32 आरोपींना साक्षीअभावी निर्दोष ठरवले आहे. बाबरी मशीद विध्वंससंदर्भात सीबीआय कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा काँग्रेसने विरोध केला आहे.
नवी दिल्ली : बाबरी मशीद विध्वंससंदर्भात सीबीआय कोर्टाच्या निर्णयावर आता काँग्रेसने देखील प्रतिक्रिया दिली आहे. सीबीआय कोर्टाचा निकाल बा सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाल म्हणाले, 'बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात सर्वांची निर्दोष मुक्तता करणे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात आहे. कारण, सुप्रीम कोर्टाने हा गुन्हा असल्याचे सांगितले होते.
सुरजेवाला म्हणाले, 'देशाला माहिती आहे, की भाजपने कट आखला होता आणि तत्कालीन भाजप सरकारचा यात समावेश होता. सुप्रीम कोर्टने याला गुन्हा असल्याचे सांगितले होते. संपूर्ण देश आशा करतोय की, केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांनी विशेष न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करावी.
काय आहे निर्णय? 1992 साली बाबरी मशीद पाडल्याचा घटनेचा अंतिम निकाल आज लागला. या प्रकरणातील सर्व 32 आरोपी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. बाबरी मशीद विध्वंस पूर्वनियोजित कट नव्हता, असा निर्वाळा लखनौ कोर्टाने दिला आहे. या प्रकरणात साक्षीदार प्रबळ नव्हते असे कोर्टाने म्हटलं आहे. लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व 32 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. ही घटना अचानक घडली असं देखील कोर्टानं म्हटलं आहे. या प्रकरणात एकूण 49 आरोपी होते. त्यातील 17 आरोपींचं निधन झालं आहे. या सर्वांची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली.
The decision of the Special Court to acquit all the accused in #BabriMasjidDemolitionCase runs counter to Supreme Court Judgement as also the Constitutional spirit.
Our statement -: pic.twitter.com/C6S6fpMUq7 — Randeep Singh Surjewala (@rssurjewala) September 30, 2020
Babri verdict : ऐतिहासिक निकाल, 28 वर्ष, 49 आरोपी... विध्वंस ते निकाल, संपूर्ण घटनाक्रम या आरोपींची निर्दोष मुक्तता लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुधीर कक्कर, सतीश प्रधान, राम चंद्र खत्री, संतोष दुबे, ओम प्रकाश पांडे, कल्याण सिंह, उमा भारती, रामविलास वेदांती, विनय कटियार, प्रकाश शरण, गांधी यादव, जय भानसिंग, लल्लू सिंह, कमलेश त्रिपाठी, बृजभूषण सिंह, रामजी गुप्ता, महंत नृत्य गोपाल दास, चंपत राय, साक्षी महाराज, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, धर्मदास, जय भगवान गोयल, अमरनाथ गोयल, साध्वी ऋतंभरा, पवन पांडे, विजय बहादुर सिंह, आरएम श्रीवास्तव आणि धर्मेंद्रसिंग गुजर
बाबरी विध्वंस प्रकरण : जादूने बाबरी मशीद गायब केली होती का? कोर्टाच्या निर्णयानंतर असदुद्दीन ओवैसींचा सवाल या आरोपींचं झालं आहे निधन बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल, आचार्य गिरीराज किशोर, विष्णु हरी डालमिया, महंत अवैद्यनाथ, महंत परमहंस दास, महामंडलेश्वर जगदीश मुनि, बैकुंठ लाल शर्मा प्रेम, डॉ सतीश नागर , मोरेश्वर साळवे (शिवसेना नेता) , डीवी रे (तत्कालीन एसपी), विनोद कुमार वत्स, रामनारायण दास, हरगोबिंद सिंह, लक्ष्मी नारायण दास महात्यागी, रमेश प्रताप सिंह, विजयराजे सिंधिया.
Lal Krishna Advani on Babri verdict | निकाल आल्यावर लालकृष्ण आडवाणींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...