एक्स्प्लोर

Congress Rally : महागाई, बेरोजगारीविरोधात रामलीलावर काँग्रेसचा एल्गार; राहुल गांधींच्या नेतृत्त्वात मोदी सरकारविरोधात हल्लाबोल

Congress Rally : महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीबाबत भाजप सरकारवर हल्लाबोल करत आज काँग्रेस दिल्लीच्या रामलीला मैदानावर रॅली काढणार आहे.

Congress Rally : राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नेतृत्त्वात आज काँग्रेस (Congress) मोदी सरकारविरोधात हल्लाबोल करणार आहे. महागाई (Inflation), जीवनावश्यक वस्तूंवरची जीएसटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन काँग्रेसचं आंदोलन आहे. 7 सप्टेंबरपासून 'भारत जोडो यात्रा' (Bharat Jodo Yatra) सुरू होण्याआधी महागाई ते बेरोजगारी आणि जीएसटीच्या मुद्द्यावरून भाजपविरोधात काँग्रेस रामलीला मैदानावर आंदोलन करणार आहे. रामलीला मैदानावर आज होणाऱ्या या रॅलीत काँग्रेसनं मोठ्या संख्येनं लोक जमल्याचा दावा केला आहे. या रॅलीत सहभागी होण्यासाठी देशभरातून काँग्रेस कार्यकर्तेही पोहोचत आहेत.  

काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रॅलीपूर्वी सकाळी 11 वाजता पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते काँग्रेस मुख्यालयात जमणार आहेत. येथे हे सर्वजण बसमध्ये बसून रामलीला मैदानाकडे रवाना होतील. या रॅलीची तयारी पक्षानं पूर्ण केली असतानाच पोलिसांनीही सुरक्षेच्या दृष्टीने विशेष बंदोबस्त तैनात केला आहे. 

भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबरपासून सुरू होणार 

काँग्रेसची 7 सप्टेंबरपासून कन्याकुमारी ते काश्मीर 3,500 किमी 'भारत जोडो यात्रा' सुरु होण्यापूर्वी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. भारत जोडो यात्रे दरम्यान, राहुल गांधी महागाई आणि बेरोजगारी या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि जातीय सलोखा वाढवण्यासाठी देशभर प्रवास करणार आहेत. 'भारत जोडो यात्रा' हा काँग्रेस पक्षाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा जनसंपर्क यात्रा आहे. ज्यामध्ये पक्षाचे नेते तळागाळातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपचारासाठी देशाबाहेर गेल्या असून पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधीही त्यांच्यासोबत परदेशात आहेत. त्यामुळे त्या दोन्ही कार्यक्रमांत सहभागी होणार नाहीत. राहुल गांधी देखील सध्या सोनिया गांधी यांच्यासोबत परदेशात आहेत. मात्र ते शनिवारपर्यंत भारतात परत येणार आहेत. 

सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत : काँग्रेस

महागाई आणि बेरोजगारीवरून काँग्रेस सरकारवर हल्लाबोल करत आहे आणि म्हणत आहे की, हे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत. त्यावर सर्व मंचांवर चर्चा झाली पाहिजे. पक्ष सोडल्यानंतर काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद हे देखील जम्मूतील सैनिक फार्म येथे पहिल्या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. राजीनामा पत्रात काँग्रेस नेतृत्वावर टीका करणारे आझाद रविवारी आपला हल्ला आणखी तीव्र करू शकतात.

काँग्रेसनं मात्र, जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आझाद यांची पक्ष नेतृत्वाविरुद्धची जाहीर वक्तव्य ही सत्ताधारी भाजपच्या इशाऱ्यावर सुरू केलेली "विचलित करण्याची युक्ती" असल्याचं म्हटलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 22 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSanjay Raut Mumbai : त्या सर्व्हेची ऐसी की तैसी, 160 जागा आम्ही जिंकणारच! राऊतांचा हल्लाबोल#abpमाझाRajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
Embed widget