राहुल गांधींचे Tweeter अनलॉक; काँग्रेस पक्षाचे आणि नेत्यांचे अकाऊंटही पुन्हा सुरु
Rahul Gandhi : राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट एका आठवड्यानंतर पुन्हा सुरु करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्वीट करुन त्यांची ओळख जाहीर केली होती.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊट एका आठवड्यानंतर पुन्हा एकदा सुरु करण्यात आलं आहे. सोबतच काँग्रेस पक्ष आणि इतर महत्वाच्या नेत्यांचे ट्विटर अकाऊंटही सुरु झाले आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीतील अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्वीट केला होता. त्यामुळे आपल्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ट्विटरने त्यांच्या अकाऊंटवर कारवाई केली होती.
राहुल गांधी यांनी दिल्लीतील अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यांनंतर पीडितेच्या कुटुंबियांचा फोटो ट्वीट करत ओळख जाहीर केली होती. त्यानंतर ट्विटरने या संदर्भातील स्पष्टीकरण राहुल गांधीकडे मागितले होते. नंतर ट्विटरने त्यांचे अकाऊंट तात्पुरतं निलंबित केलं होतं.
राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्वीट केला होता. त्याला भाजपकडूनही आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर ट्विटरनं राहुल गांधी यांचं ते ट्वीट हटवलं होतं. त्यांचं ट्विटर अकाऊंट तात्त्पुरतं निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने ट्विटर आणि दिल्ली पोलिसांना पत्र पाठवत या संदर्भात कारवाई करण्यास सांगितले होते.
ट्विटर हे केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत असून भारतीय लोकशाहीमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता
या प्रकरणी ट्विटरने खालील स्पष्टीकरण दिलं होतं,
ट्विटर आपल्या धोरणांबाबत निष्पक्षपणे काम करतं. कंपनीच्या नियमांचे उल्लंघन करणारे फोटो शेअर करणाऱ्या सर्वांवर ट्विटरकडून कारवाई करण्यात आली आहे आणि या पुढेही सुरु राहिल. व्यक्तीच्या खासगीपणाला आणि सुरक्षेला ट्विटरकडून सर्वाधिक प्राधान्य दिलं जातं.
कंपनीच्या धोरणानुसार, एखादे ट्वीट हे कंपनीच्या नियमांचे उल्लंघन करणारे असेल आणि अजूनही ते ट्वीट डिलीट केलं नसेल तर संबंधित अकाऊंट आम्ही तात्पुरत्या स्वरुपात बंद करु शकतो.
लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या अल्पवयीन पीडितेच्या पालकांची ओळख ट्विटवरुन जाहीर केल्याबद्दल राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने आम्हाला कळवलं होतं. या गोष्टीमुळे कंपनीच्या नियमांचे आणि भारतीय कायद्याचे उल्लंघन होत असल्याचं लक्षात आल्यानंतर ट्विटरने काही ट्विटर अकाऊंट निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
