एक्स्प्लोर
तुम्ही लग्न कधी करणार? राहुल गांधींचं उत्तर...
गेल्या वर्षीही ऑक्टोबर महिन्यात राहुल गांधी यांना लग्नाबाबत प्रश्न विचारला असता, ते म्हणाले होते की, “माझा नशिबावर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे जेव्हा होईल लग्न, तेव्हा होईल.”

हैदराबाद : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 48 वर्षांचे झाले आहेत. वेळोवेळी त्यांना त्यांच्या लग्नाबाबत विचारणा केली जाते. तसेच हैदराबादमध्ये त्यांना विचारले गेले, त्यावेळी मात्र त्यांनी थोडं हटके उत्तर दिले. पक्षाच्या कामानिमित्त राहुल गांधी हैदराबादमध्ये होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या लग्नाबाबत विचारले गेले, तेव्हा ते म्हणाले, “मी पक्षाशी लग्न केले आहे.” अर्थात, यावेळीही राहुल गांधींनी लग्नाबाबतच्या प्रश्नाला उत्तर देणे अप्रत्यक्षपणे टाळलं. याच वर्षी उत्तर प्रदेशातील दिग्गज नेते अखिलेश सिंह यांची मुलगी आदिती सिंह यांच्याशी राहुल गांधी यांचं लग्न होणार असल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या. मात्र त्यानंतर आदिती सिंह यांनी स्वत:हून माध्यमांसमोर येत, या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. किंबहुना, “आदिती सिंह यांनी सांगितले होते की, राहुल गांधी हे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. मी त्यांचा प्रचंड आदर करते. त्यामुळे लग्नाबाबतच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये.” गेल्या वर्षीही ऑक्टोबर महिन्यात राहुल गांधी यांना लग्नाबाबत प्रश्न विचारला असता, ते म्हणाले होते की, “माझा नशिबावर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे जेव्हा होईल लग्न, तेव्हा होईल.” दरम्यान, राहुल गांधी यांचं नातं हे नेहरु-गांधी घराण्याशी आहे. देशाच्या जडण-घडणीत नेहरु-गांधी घराण्याचं योगदान बहुमूल्य आहे. अर्थात, राहुल गांधी यांच्या भोवतीचं वलय अत्यंत मोठं आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाविषयी चर्चा काही काळाच्या अंतराने होतच असतात.
आणखी वाचा























