एक्स्प्लोर

गोवा विधानसभेत राहुल गांधी आणि मनोहर पर्रिकर यांची भेट

कालच राहुल गांधी यांनी राफेल ऑडिओ क्लिपवर अद्याप कोणतीच करवाई झाली नसल्याने त्या क्लिपमधील माहिती खरी आहे, असं म्हणायला वाव असल्याचं ट्वीट करत मुख्यमंत्री पर्रिकर यांना चिमटा काढला होता.

पणजी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली. विधानसभेत जाऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या तब्येतीची विचारपूस करत लवकर बरे व्हा, अशी सदिच्छा व्यक्त केली. राहुल गांधी गेले दोन दिवस विश्रांतीसाठी गोव्यातच आहेत. गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं. गंभीर आजारी असूनही मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर या अधिवेशनाला उपस्थित असल्याने सगळ्यांचे लक्ष त्यांच्याकडे होतं. यामध्ये गोव्यात सुट्टीवर आलेले राहुल गांधीही त्याला अपवाद ठरले नाहीत. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधानसभेचे कामकाज संपताच विधानसभेच्या मागील बाजूने राहुल गांधी आत आले. त्यांनी पहिल्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये जाऊन मनोहर पर्रिकर यांच्या तब्येतीची आस्थेने चौकशी करत लवकर बरे व्हा, अशी सदिच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांची भेट सदिच्छा होती. तब्येत इतकी खालावली असतानाही तुम्ही हे सगळे कसे करता असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला. त्यावर पर्रिकर यांनी आपला हा स्वभाव असून आपण जे ठरवतो ते करतो, त्यामुळे आपल्याला त्याची सवय झाली असल्याचं सांगितलं. राहुल यांनी आपल्या आईच्या वतीने पर्रिकर यांना शुभेच्छा देताना, दिल्लीमधील प्रदूषणाला कंटाळून आपण हवापालट करण्यासाठी गोव्यात अधूनमधून येत असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्री पर्रिकर यांची भेट घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या विनंतीला मान देऊन विरोधी पक्षाच्या दालनात जाऊन काँग्रेस आमदारांची भेट घेतली. पुढच्या महिन्यात राजकीय भेटीवर गोव्यात येणार असल्याचं त्यांनी काँग्रेस आमदारांना सांगितलें. कालच राहुल गांधी यांनी राफेल ऑडिओ क्लिपवर अद्याप कोणतीच करवाई झाली नसल्याने त्या क्लिपमधील माहिती खरी आहे, असं म्हणायला वाव असल्याचं ट्वीट करत मुख्यमंत्री पर्रिकर यांना चिमटा काढला होता.

महत्त्वाच्या बातम्या

AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
CJP : कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?  सौरव दास, आशुतोष रांका यांच्यावर कोणती जबाबदारी?
कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?
PM Modi Instagram Reel :'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ
'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ
Mohan Bhagwat On LGBTQ Marriage : समलैंगिक विवाहाला संघाकडून संमती मिळेल का? Gen Z च्या प्रश्नावर मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
समलैंगिक विवाहाला संघाकडून संमती मिळेल का? Gen Z च्या प्रश्नावर मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Embed widget