एक्स्प्लोर

काँग्रेस नेत्यांची पाकिस्तानच्या माजी मंत्र्यासोबत बैठक, मोदींचा आरोप

गुजरातच्या बनासकांठा येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर मोठा आरोप केला.

अहमदाबाद : काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांनी मोदींवर केलेल्या वक्तव्यावरुन गुजरातचं राजकारण तापलेलं आहे. त्यातच अय्यर यांच्या नावाने भाजपने काँग्रेसवर मोठा आरोप केला आहे, ज्यात भारतातील सत्ता बदलण्यासाठी पाकिस्तानची मदत घेण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. गुजरातच्या बनासकांठा येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर मोठा आरोप केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार अहमद पटेल यांना गुजरातचा मुख्यमंत्री करण्यासाठी मणिशंकर अय्यर यांच्या घरी पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्यासोबत बैठक झाली, असा आरोप मोदींनी केला. अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या बैठकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ही बैठक कशासाठी होती, याचा खुलासा या बैठकीला उपस्थित असलेल्या व्यक्तींनीच करावा, अशी मागणी जेटलींनी केली आहे. ''पाकिस्तानच्या उच्चायुक्तांसोबत काँग्रेस नेत्यांची जी बैठक झाली त्यात गुजरातची रणनिती ठरवण्यात आली का? सत्ताबदलाची रणनिती ठरवण्यासाठी बैठक होती का?'' असा सवाल भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर या वादाला सुरुवात झाली. दरम्यान मोदींनी केलेला आरोप निराधार असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. शिवाय काँग्रेसने मोदींच्या अचानक ठरलेल्या पाकिस्तान दौऱ्यावरही आक्षेप घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
Embed widget