एक्स्प्लोर

Rahul Gandhi :राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, गौतम अदानींच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप

Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावरुन पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला. तसेच यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी म्हटलं की, 'पंतप्रधान मोदी यांचा आत्मा अदानींमध्ये आहे.' तसेच त्यांनी अॅपलच्या अलर्टवरुन देखील सरकारवर देखील निशाणा साधला. 

त्यांनी म्हटलं की, 'आम्ही अदानीच्या मुद्द्यावर सरकारला इतकं कोंडीत पकडलं की ते आता रगिरीचा अवलंब केला आहे. सध्या सरकारमध्ये अदानी पहिल्या क्रमांकावर आहेत आणि पंतप्रधान मोदी हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर अमित शाह हे तिसऱ्या क्रमांकावर येतात. सध्या देशाची सत्ता अदानींच्या हातात आहे. तसेच मोदी सरकारवर हल्लाबोल करताना राहुल गांधी यांनी म्हटलं, तुम्ही कितीही हेरगिरी केली तरी आम्ही मागे हटणार नाही. '

राहुल गांधींनी सादर केले पुरावे

आपल्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांना अॅपलच्या फोनवर मिळालेल्या इशाऱ्याविषयी देखील भाष्य केलं. यावेळी त्यांनी मेलची एक ई कॉपी देखील सादर केली. ज्यामध्ये म्हटलं होतं की, 'विरोधी पक्षातील सगळ्या नेत्यांना अॅपलकडून हा इशारा देण्यात आला आहे. पण आम्ही हरणार नाही. आम्ही लढणार आहोत, जितकंही फोन टॅपिंग करायचं आहे तितकं करा, आम्ही घाबरणार नाही.' 

'फक्त सरकार बदलून अदानी बाजूला नाही होणार'

राहुल गांधी हे सातत्याने हे मोदी सरकार नाही तर अदानी सरकार असल्याचं वक्तव्य करत असतात. त्यांच्या याच वक्तव्यावरुन त्यांना प्रश्न विचारण्यात आला की हे सरकार कसं बदलेल? यावर बोलताना राहुल गांधी यांनी म्हटलं की, 'मी यावर विचार केला आहे. फक्त सरकार बदलून अदानी बाजूला होणार नाही. मी वेळ आल्यावर सांगेन.' तसेच भांडवलशाहीवर बोलताना त्यांनी म्हटलं की, 'मी आयडियाज ऑफ इंडियाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. ही एक मोठी लढाई आहे. मला सत्य बोलण्याची सवय आहे. आपण मक्तेदारीचे बळी बनत आहोत. परिणामी आपल्या देशात गुलामगिरी वाढत चाललीये. मी गुलामगिरीच्या पूर्णपणे विरोधात आहे. सध्या ईडी आणि सीबीआयवर देखील अदानींचे नियंत्रण आहे. यामुळे दलित, आदिवासी लोकांना त्यांचे अधिकार मिळत नाही,' असं राहुल गांधींनी म्हटलं. 

हेही वाचा : 

Kavitha Kalvakuntla : 'तेलंगणा विकास मॉडेल'ची किर्ती सर्वदूर, विधानसभा निवडणुकीत हाच महत्त्वाचा मुद्दा; के कविता यांचं ऑक्सफर्ड विद्यापीठात व्याख्यान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह जादा मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra CM Oath Devendra Fadnavis : शपथविधीसाठी नागपुरातील गोपाळ चहावाला यांना निमंत्रणMNS vs Marwadi Mumbai Girgaon : मुंबई भाजपची..मारवाडीच बोलायचं, मनसैनिकांनी दुकानदाराला धुतलं!Uddhav Thackeray : तयारीला लागा...मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरेंचे माजी नगरसेवकांना आदेशABP Majha Headlines : 5 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह जादा मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी,गुंतवणूकदार मालामाल
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Embed widget