शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करणाऱ्या मोदी सरकार ऐका.. राहुल गांधी यांची केंद्रावर टीका
केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात हजारो शेतकरी सध्या दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. हजारो शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला फटकारले आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या शेतकर्यांचे आंदोलन दिल्ली येथे पोहोचले आहे. यापूर्वी हरियाणात शेतकऱ्यांना रोखण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. अनेक शेतकर्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आमच्यासाठी जय किसान होता आणि राहील, असे ट्विट राहुल गांधी यांनी करत मोदी सरकारचा निषेध केला आहे.
केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांकडून जोरदार आंदोलने सुरु आहेत. सिंधूच्या सीमेवर शेतकर्यांनी रात्र काढली अजूनही तिथेच आहेत. आता त्यांनी सिंधूच्या सीमेवरुन माघार घेणार नाही, असा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर दिल्ली पोलिसांनी प्रवाश्यांसाठी नियमावली प्रसिद्ध केली आहे. सिंधू सीमा दोन्ही बाजूंनी बंद असून पर्यायी मार्ग निवडण्यास दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.
अन्याय के ख़िलाफ़ आवाज़ उठाना अपराध नहीं, कर्तव्य है।
मोदी सरकार पुलिस की फ़र्ज़ी FIR से किसानों के मज़बूत इरादे नहीं बदल सकती। कृषि विरोधी काले क़ानूनों के ख़त्म होने तक ये लड़ाई जारी रहेगी। हमारे लिए ‘जय किसान’ था, है और रहेगा! pic.twitter.com/EZWxMpIoJc — Rahul Gandhi (@RahulGandhi) November 28, 2020
शेतकर्यांचे आंदोलन रोखण्यासाठी ज्या प्रकारे प्रयत्न केला गेला जात आहे, त्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. राहुल गांधी यांनी एका ट्विटमध्ये मोदी सरकारच्या शेतकऱ्यांप्रती असलेल्या निर्णयावर टीका केली आहे.
राहुल गांधी म्हणाले, 'न्यायाविरोधात आवाज उठवणे हा गुन्हा नाही, कर्तव्य आहे. मोदी सरकार पोलिसांच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल करुन शेतकऱ्यांना थांबवू शकत नाही. हा लढा कृषीविरोधी काळा कायदा संपेपर्यंत चालूच राहील, आमच्यासाठी 'जय किसान' होता आणि असेल '