एक्स्प्लोर

काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे भाजपकडून राज्यसभेवर जाणार, सूत्रांची माहिती

मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राज्यातील काँग्रेसचं सरकार संकटात असताना ज्योतिरादित्य शिंदे हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपकडून त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळण्याची शक्यता आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत असताना मोठी माहिती समोर येत आहे. मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपच्या कोट्यातून त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याचंही कळत आहे. दोन दिवसांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांची भाजपच्या नेत्यांशी यासंदर्भात चर्चा झाल्याचं समोर येत आहे. या चर्चेनंतर ज्योतिरादित्य शिंदे यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या फॉर्म्युल्यावर सहमती झाल्याचं कळतंय. राज्यसभेच्या उमेदवारी शिवाय ज्योतिरादित्य शिंदे यांचा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदही हवं आहे.

एकीकडे मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अशा परिस्थितीत ज्योतिरादित्य शिंदे यांची भाजप नेत्यांसोबतची भेट मध्य प्रदेशच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीत महत्त्वाची आहे. मध्य प्रदेशात ज्या राजकीय हालचाली सुरु आहे, त्यासाठी राज्यसभेची निवडणूक मुख्य कारण असल्याचं म्हटलं जात आहे. काँग्रेस आणि भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

भाजप अविश्वास ठराव आणू शकतो

विशेष म्हणजे मध्यप्रदेश विधानसभेचं अधिवेशन 15 मार्चपासून सुरू होत आहे. अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी भाजप अविश्वास प्रस्ताव सादर करुन काँग्रेसचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे. ज्योतिरादित्य शिंदेंचे समर्थक असलेल्या मध्य प्रदेश काँग्रेसमधील 17 आमदारांनी बंडाचा पवित्रा घेत बंगळुरू गाठलं आहे. या आमदारांमध्ये कमलनाथ सरकारमधील 6 मंत्र्यांचाही समावेश आहे. 16 मार्चला विधानसभेच्या पहिल्या सत्रात भाजपकडून अविश्वास ठराव आणला जाऊ शकतो. या आमदाराच्या समर्थनाच्या जोरावर काँग्रेसचं सरकार पाडण्याचा भाजपकडून प्रयत्न असणार आहे.

मध्य प्रदेश विधानसभेची पक्षीय बलाबल

मध्य प्रदेश विधानसभेत एकूण 230 जागा आहेत. 230 मधील दोन जागा सध्या रिक्त आहेत. त्यामुळे सध्या विधानसभेत 228 आमदार आहेत. ज्यामध्ये 114 काँग्रेस, 107 भाजप, 4 अपक्ष, 2 बहुजन समाज पक्ष आणि एक समाजवादी पक्षाचा आमदार आहे. काँग्रेसला या चारही अपक्ष आमदारांसह बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाचा पाठिंबा आहे.

काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे पक्ष सोडणार?

काही महिन्यांपूर्वीच ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरील बायोमधून काँग्रेसच्या पदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे ज्योतिरादित्य हे काँग्रेसपासून दूर जात असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र त्यावेळी ज्योतिरादित्य यांनी या चर्चांच खंडण केलं होतं.

इतर बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime: सोलापूरमध्ये पोलीस कॉन्स्टेबलची बदली झाली, टोकाचा निर्णय घेऊन आयुष्य संपवलं
सोलापूरच्या बार्शीत पोलीस कॉन्स्टेबलचं धक्कादायक पाऊल, टोकाचा निर्णय घेऊन आयुष्य संपवलं
लग्नात बिबट्या घुसला अन् वधू वरानं धूम ठोकली; कॅमेरामन झाला 'स्पायडरमॅन'; पंगतीमधील लोकं ताट सोडून दिसेल त्या मार्गाने फरार
लग्नात बिबट्या घुसला अन् वधू वरानं धूम ठोकली; कॅमेरामन झाला 'स्पायडरमॅन'; पंगतीमधील लोकं ताट सोडून दिसेल त्या मार्गाने फरार
साहित्य महामंडळाला अंधारात ठेवून एकनाथ शिंदेंच्या सत्काराचा कार्यक्रम, नियम धाब्यावर बसवले? आयोजक संजय नहार म्हणाले...
साहित्य महामंडळाला अंधारात ठेवून एकनाथ शिंदेंच्या सत्काराचा कार्यक्रम, नियम धाब्यावर बसवले? आयोजक संजय नहार म्हणाले...
Prabhakar Karekar Passed Away: नाट्यसंगीतातला दिग्गज हरपला! जेष्ठ शास्त्रीय गायक पं प्रभाकर कारेकर यांचं निधन
नाट्यसंगीतातला दिग्गज हरपला! जेष्ठ शास्त्रीय गायक पं प्रभाकर कारेकर यांचं निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajan Salvi On Eknath Shinde : शिवसेनाप्रवेशापूर्वी ठाण्यात भेट,शिंदेंनी साळवींना काय आश्वासन दिलं?ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 13 February 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सUday Samant On Rajan Salvi : राजन साळवींना कोणती जबाबदारी? उदय सामंतांनी सगळं सांगितलंABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 13 February 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime: सोलापूरमध्ये पोलीस कॉन्स्टेबलची बदली झाली, टोकाचा निर्णय घेऊन आयुष्य संपवलं
सोलापूरच्या बार्शीत पोलीस कॉन्स्टेबलचं धक्कादायक पाऊल, टोकाचा निर्णय घेऊन आयुष्य संपवलं
लग्नात बिबट्या घुसला अन् वधू वरानं धूम ठोकली; कॅमेरामन झाला 'स्पायडरमॅन'; पंगतीमधील लोकं ताट सोडून दिसेल त्या मार्गाने फरार
लग्नात बिबट्या घुसला अन् वधू वरानं धूम ठोकली; कॅमेरामन झाला 'स्पायडरमॅन'; पंगतीमधील लोकं ताट सोडून दिसेल त्या मार्गाने फरार
साहित्य महामंडळाला अंधारात ठेवून एकनाथ शिंदेंच्या सत्काराचा कार्यक्रम, नियम धाब्यावर बसवले? आयोजक संजय नहार म्हणाले...
साहित्य महामंडळाला अंधारात ठेवून एकनाथ शिंदेंच्या सत्काराचा कार्यक्रम, नियम धाब्यावर बसवले? आयोजक संजय नहार म्हणाले...
Prabhakar Karekar Passed Away: नाट्यसंगीतातला दिग्गज हरपला! जेष्ठ शास्त्रीय गायक पं प्रभाकर कारेकर यांचं निधन
नाट्यसंगीतातला दिग्गज हरपला! जेष्ठ शास्त्रीय गायक पं प्रभाकर कारेकर यांचं निधन
IPO Update :हेक्सावेअर टेक्नोलॉजीजचा  8750 कोटींचा आयपीओ येणार, किंमतपट्टा किती? GMP कितीवर पोहोचला?
हेक्सावेअर टेक्नोलॉजीजचा 8750 कोटींचा आयपीओ येणार, किंमतपट्टा किती? GMP कितीवर पोहोचला?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना मोठा धक्का! नाशिकमधील बड्या नेत्यांचा मनसे, ठाकरे गटाला 'रामराम'
एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना मोठा धक्का! नाशिकमधील बड्या नेत्यांचा मनसे, ठाकरे गटाला 'रामराम'
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये शिखर धवनची एन्ट्री! ICC ची मोठी घोषणा, सोपवली महत्त्वाची जबाबदारी
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये शिखर धवनची एन्ट्री! ICC ची मोठी घोषणा, सोपवली महत्त्वाची जबाबदारी
Maharashtra Weather Update: पहाटे गारवा वाढला, दुपारी उष्णतेच्या झळा कायम! राज्यात येत्या 3 दिवसांत तापमान कसे? वाचा IMD Alert
पहाटे गारवा वाढला, दुपारी उष्णतेच्या झळा कायम! राज्यात येत्या 3 दिवसांत तापमान कसे? वाचा IMD Alert
Embed widget