एक्स्प्लोर
कलम-370 हद्दपार, निर्णयाचं स्वागत करुन काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदेंचा काँग्रेसला घरचा आहेर
जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेले कलम 370 रद्द करण्याचे ऐतिहासिक विधेयक राज्यसभेनंतर आज लोकसभेतही मंजूर झाले आहे. विधेयकाच्या मंजुरीसाठी लोकसभेत सर्व खासदारांनी मतदान केले. 351 विरुद्ध 72 मतांनी हे विधेयक मंजूर करण्यात आले.
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेले कलम 370 रद्द करण्याचे ऐतिहासिक विधेयक राज्यसभेनंतर आज लोकसभेतही मंजूर झाले आहे. विधेयकाच्या मंजुरीसाठी लोकसभेत सर्व खासदारांनी मतदान केले. 351 विरुद्ध 72 मतांनी हे विधेयक मंजूर करण्यात आले. काँग्रेसने मात्र या विधेयकला काल राज्यसभेत आणि आज लोकसभेतही जोरदार विरोध केला. परतु काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करत काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.
जम्मू-काश्मीरमधून कलम-370 हटवण्याच्या सरकारच्या निर्णयाचं ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्वागत केले आहे. हा निर्णय योग्य असून, तो देशहिताचा असल्याचे ट्वीट शिंदे यांनी केलं आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनीच काँग्रेसला घरचा आहेर दिल्यानं काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. या परिस्थितीत काँग्रेसच्या विचारधारेच्या विरोधात जाऊन शिंदे यांनी केलेलं ट्वीट अनेकांच्या भुवया उंचावणारं आहे.
दरम्यान जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचे विधेयकही 366 विरुद्ध 66 मतांनी मंजूर करण्यात आले. राज्याचे विभाजन करुन जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्यात आले आहेत. या निर्णयानंतर विरोधकांकडून जोरदार टीका सुरु झाली होती. परंतु ज्योतिरादित्य शिंदे यांनी विधेयकाला समर्थन दिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
#जम्मूकश्मीर और #लद्दाख को लेकर उठाए गए कदम और भारत देश मे उनके पूर्ण रूप से एकीकरण का मैं समर्थन करता हूँ। संवैधानिक प्रक्रिया का पूर्ण रूप से पालन किया जाता तो बेहतर होता, साथ ही कोई प्रश्न भी खड़े नही होते। लेकिन ये फैसला राष्ट्र हित मे लिया गया है और मैं इसका समर्थन करता हूँ।
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) August 6, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
Advertisement