Rahul Gandhi : भाषण राहुल गांधींचे पण संसद टीव्हीवर दिसले लोकसभा अध्यक्ष; काँग्रेसने उपस्थित केले प्रश्न
Parliament Monsoon Session 2023 : खासदारकी पुन्हा बहाल केल्यानंतर राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या भाषणाचा बराचसा भाग दाखवलाच नाही असा आरोप काँग्रेसकडून सरकारवर करण्यात येत आहे.
![Rahul Gandhi : भाषण राहुल गांधींचे पण संसद टीव्हीवर दिसले लोकसभा अध्यक्ष; काँग्रेसने उपस्थित केले प्रश्न Congress leader jayram ramesh slams modi government on rahul gandhi speech sansad tv detail marathi news Rahul Gandhi : भाषण राहुल गांधींचे पण संसद टीव्हीवर दिसले लोकसभा अध्यक्ष; काँग्रेसने उपस्थित केले प्रश्न](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/09/c9bb47e22dd27a52dede133175e6a9c51691597634681720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jayram Ramesh Tweet : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संसदेत एकूण 37 मिनिटे भाषण केलं पण त्यातील केवळ 14 मिनिटचं त्यांना कॅमेरात दाखवण्यात आलं असल्याचा दावा काँग्रेसचे नेते जयराम रमेश (Jayram Ramesh) यांनी केला आहे. राहुल गांधी हे मणिपूरच्या (Manipur) मुद्द्यावर भाष्य करत असताना त्यांना संसद टीव्हीवर (Sansad TV) जास्त काळ दाखवण्यात आलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा मिळाल्यानंतर त्यांनी संसदेमध्ये पुनरागमन केले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात ही मणिपूरच्या मुद्द्यावरुन केली. पण त्यांना पूर्णवेळ संसद टीव्हीने दाखवलं नसल्याचा दावा काँग्रेसकडून (Congress) करण्यात येत आहे.
काय म्हणाले जयराम रमेश ?
काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, अविश्वास प्रस्तावादरम्यान दुपारी 12:09 ते दुपारी 12:46 पर्यंत राहुल गांधी यांनी भाषण केलं. म्हणजेच त्यांनी एकूण 37 मिनिटे सभागृहात आपलं म्हणणं मांडलं. पण त्यापैकी संसद टीव्हीतील कॅमेरामध्ये त्यांना फक्त 14 मिनिटे 37 सेकंदच दाखवण्यात आलं आहे. म्हणजेच त्यांना 40 टक्क्यांपेक्षा कमी काळ स्क्रिनवर दाखवले आहे. पुढे बोलतांना त्यांनी पंतप्रधान मोदी यांना नेमकी कशाची भीती वाटत आहे असा सवाल देखील विचारला आहे.
This gets even worse!@RahulGandhi spoke on Manipur for 15 min 42 seconds.
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) August 9, 2023
During which, Sansad TV’s camera focused on the Speaker Om Birla for 11 min 08 seconds i.e. 71% of the time.
Sansad TV showed @RahulGandhi on video for only 4 min 34 seconds while he spoke on Manipur.
दरम्यान जयराम रमेश यांनी आणखी एक ट्वीट करत या प्रकारावर टीका केली आहे. त्यांनी त्यांच्या दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, आपल्या भाषणात मणिपूरच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी 15 मिनिटे 42 सेकंद भाषण केलं. यावेळी 11 मिनिटे 08 सेकंद संसद टीव्हीच्या कॅमेराने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा चेहरा दाखवला. त्यामुळे संसद टीव्हीने राहुल गांधी यांना केवळ 4 मिनिटे 34 सेकंदच टीव्ही स्क्रिनवर दाखवले आहे.
This gets even worse!@RahulGandhi spoke on Manipur for 15 min 42 seconds.
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) August 9, 2023
During which, Sansad TV’s camera focused on the Speaker Om Birla for 11 min 08 seconds i.e. 71% of the time.
Sansad TV showed @RahulGandhi on video for only 4 min 34 seconds while he spoke on Manipur.
राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा मिळाल्यानंतर त्यांच्या भाषणाची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती. पण त्यांना केवळ अगदी काहीवेळासाठी कॅमेरासमोर दाखवल्यामुळे काँग्रेसकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)