2000 Note: मागील नोटबंदीच्या निर्णयाप्रमाणे हा निर्णयही बालिश; पाहा आणखी काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण...
2000 Note: 2 हजारच्या टबंदीच्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे, यावेळी त्यांनी मागील नोटबंदीवर देखील भाष्य केलं आहे.
2000 Note: केंद्र सरकारच्या 2 हजारची नोट बंद करण्याच्या निर्णयावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी देखील नोटबंदीच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. मागच्या नोटबंदीच्या निर्णयाप्रमाणे हा नोटबंदीचा निर्णयही बालिश आहे, असं ते म्हणाले.
मागील नोटबंदीवेळी देखील सरकारची उद्दिष्टं फोल
मागच्या नोटबंदीची 3 मोठी उद्दिष्टं होती, पाकिस्तानचा दहशतवाद बंद होईल, भ्रष्टाचार बंद होईल, काळा पैसा नष्ट होईल, मात्र यातील एकही उद्दिष्ट साध्य झालेलं नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केली. मागील नोटबंदीच्या निर्णयामुळे स्वत: मोदी (PM Narednra Modi) अक्षरश: तोंडघशी पडले, नोट बदली करण्यासाठी लोकांनी बँकांबाहेर गर्दी केली आणि शेकडो माणसं मृत्यूमुखी पडल्याचं पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले.
नोटबंदीमुळे भारतातील कमीत कमी 120 कोटी लोक प्रभावित
सरकारच्या एका निर्णयामुळे इतक्या मोठ्या लोकसंख्येला मोठा त्रास झाल्याचं उदाहरण माझ्यासमोर दुसरं नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नोटबंदीमुळे भारतातील कमीत कमी 120 कोटी लोक प्रभावित झाल्याचं पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले.
सरकारच्या नोटबंदी निर्णयामुळे जनतेला त्रास
अगदी 10 वर्षाच्या मुलापासून 90 वर्षाच्या वृद्धाला मागील नोटबंदीचा त्रास झाल्याची आठवण पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी करुन दिली. कुणाला औषध घ्यायचं, कुणाला शाळेची पुस्तकं घ्यायची, कुणाला दूध-भाजीपाला घ्यायचा, पण नोटबंदीमुळे लोकांना वस्तू घेता आल्या नाही आणि जनतेला प्रचंड त्रास झाल्याचं पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले.
नोटबंदीच्या निर्णयामुळे कोट्यवधी लोक प्रभावित
महायुद्धातही जितकी लोकं प्रभावित झाले नाही, तितके एका नोटबंदीच्या निर्णयामुळे झाल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. नोटबंदीच्या निर्णयामुळे मूळ उद्दिष्ट साध्य न होता अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचं ते म्हणाले. कर्नाटकच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवावरुन लोकांचं लक्ष विचिलत करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचं म्हणणं आहे.
ज्यांच्याकडे 2 हजारांच्या नोटा असतील त्यांना बदलण्याचा त्रास
ज्यांच्याकडे 2 हजारांच्या नोटा आहेत, त्यांना नोटा बदलण्याचा त्रास होईल. बऱ्याच दिवसांपासून 2 हजारच्या नोटांची छपाई बंद असल्याने (RBI To Withdraw Rs 2000) बहुदा कोणाकडे नोटा नसाव्या, असंही पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले.
हेही वाचा:
RBI on 2000 Note: मोठी बातमी! 2000 रुपयाच्या नोटा चलनातून बंद होणार, 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहणार