एक्स्प्लोर

SSR Case | सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास अजूनही सुरुच, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास करणार : सीबीआय

Sushant singh Case | अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात कोणतीही शक्यता फेटाळली नाही, या प्रकरणात आता आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं तपास करणार असल्याचं सीबीआयनं सुब्रमण्यम स्वामींच्या पत्राला उत्तर देताना सांगितलंय.

नवी दिल्ली: सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय गेल्या काही महिन्यांपासून करत आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात कोणतीही शक्यता फेटाळली नसून आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन तपास केला जाणार आहे, असं सीबीआयने खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना एका पत्राद्वारे सांगितलं आहे.

सुब्रमण्यम स्वामींच पत्र खासदार सुब्रमण्यम स्वामींनी जुलैमध्ये (PMO) पंतप्रधान कार्यालयाला एक पत्र लिहून सुशांत सिंह राजपूत प्रकरणात तपास कुठपर्यंत आला अशी विचारणा केली होती. पंतप्रधान कार्यालयाने हे पत्र सीबीआयकडे पाठवलं होतं. आता 30 डिसेंबर रोजी सीबीआयने याचं उत्तर दिलं असून त्यामध्ये सांगितलं आहे की अजून या प्रकरणाचा तपास पूर्णपणे संपवला नाही. सीबीआयने या पत्रात सांगितलंय की, ते अनेक बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत असून आता यामध्ये अत्याधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

सीबीआयने खासदार सुब्रमण्यम स्वामींना पाठवलेल्या पत्रात आतापर्यंत या तपासात काय प्रगती झाली याचा उल्लेख केला असून सुरुवातीपासूनचा घटनाक्रम मांडला आहे. सुरुवातीला जेव्हा पाटनामध्ये एफआयआर दाखल झाला तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. त्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये तपास केला, मुंबईच्या बाहेर ज्या-ज्या ठिकाणी या घटनेचा संदर्भ आढळतो त्या-त्या ठिकाणी तपास केला.

ती हत्या नव्हती, एम्सचा अहवाल सीबीआयने या प्रकरणाचा तपास स्वत: कडे घेऊन जवळपास पाच महिने होत आहेत. दरम्यानच्या काळात ऑक्टोबर महिन्यात एम्सने सीबीआयला एक फॉरेन्सिक अहवाल दिला होता. त्यामध्ये सुशातंचा मृत्यू हा आत्महत्येमुळे झालेला असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. या एम्सच्या अहवालावर सीबीआयचं नेमकं काय मत आहे हे अद्याप समोर आलं नाही आणि त्याचा कुठेही उल्लेख या पत्रामध्येही नाही.

देशाच्या सर्वोच्च तपास संस्थेने सुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास मुंबई पोलिसांकडून घेऊन आतापर्यंत 145 दिवस झाले आहेत. तरीही या प्रकरणात एकही नवी माहिती समोर आली नाही. तसेच एम्सच्या अहवालावरही काहीच उत्तर सीबीआयकडून देण्यात येत नाही. अद्याप तपास सुरु आहे एवढंच उत्तर सीबीआयकडून देण्यात येत आहे.

संबंधित बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Embed widget