'सुशांत सिंह राजपूतची हत्या की आत्महत्या? CBIनं स्पष्ट करावं' : अनिल देशमुख
सुशांत सिंह केसवरुन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी सीबीआयवर निशाणा साधलाय. या प्रकरणी सीबीआयने लवकरात लवकर खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

नागपूर: अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या की हत्या हे सीबीआयनं स्पष्ट करावं असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय. नागपूर येथे एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलंय.
गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, "सुशांत सिंह केसमध्ये सीबीआयला तपास देऊन चार ते पाच महिने झाले. त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली हे लोकांना जाणून घ्यायचं आहे. सीबीआयनं लवकरात लवकर या केसच्या बाबतीतला तपासाचा अहवाल जनतेसमोर ठेवावा. राज्याचा गृहमंत्री म्हणून मला सतत लोक हेच विचारतात."
अनिल देशमुखांनी या प्रकरणी सीबीआयवर निशाणा साधत पुढं म्हटलं की, "महाराष्ट्रातले लोक तसेच महाराष्ट्राबाहेरचे लोक अतिशय उत्सुकतेनं सीबीआयच्या या तपासाची वाट बघताहेत की कधी एकदा सीबीआयचा तपास समोर येतो. त्यामुळं ही आत्महत्या होती की त्याची हत्या करण्यात आली याबद्दलचं सत्य जनतेसमोर येईल. आज गृहमंत्री म्हणून लोक मला सातत्यानं विचारतात की या केसचं काय झालं. त्यामुळं सीबीआयनं याचा लवकरात लवकर खुलासा करावा."
नागपूरात 15 टक्क्यांनी गुन्हे कमी नागपूर हे गृहमंत्र्याचं शहर असूनदेखील या शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हे घडतात असा नेहमी आरोप केला जातोय. आता या शहरात गुन्ह्यांची संख्या कमी झाल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. अनिल देशमुख म्हणाले की, "नागपूरमध्ये गेल्या काही वर्षाच्या तुलनेत 15 टक्क्यांनी गुन्ह्यांमध्ये कमी आली आहे." क्राईम कॅपिटल अशी असणारी नागपूरची ओळख आता पुसून काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या:
- Drug Case | सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी NCBची मोठी कारवाई; ड्रग्ज पेडलर रिगल महाकालला अटक
- Birthdaty Special | ... राजकारणातील कवी दबंग; अनिल देशमुखांकडून आठवलेंना खास शुभेच्छा
- EWS चा जीआर काढून महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा खून केला, मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांचा आरोप
Before You Go
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
महत्त्वाच्या बातम्या






















