एक्स्प्लोर

High Court On Condom Advertisement: कंडोम जाहिरातीत गरबा खेळताना दाखवणे म्हणजे भावना दुखावणे नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

High Court On Condom Advertisement: कंडोमच्या जाहिरातीत गरबा खेळताना दाखवणे हे धार्मिक दुखावण्यासारखे नसल्याचा निर्वाळा मध्यप्रदेश हायकोर्टाने दिला आहे.

High Court On Condom Advertisement: कंडोमच्या जाहिरातीत (Condom Advertisement) जोडप गरबा खेळताना दाखवणे हे भावना दुखावणारे नसल्याचा स्पष्ट निकाल मध्य प्रदेश हायकोर्टाने (Madhya Pradesh High Court) दिला आहे. कंडोमच्या जाहिरातीत गरबा खेळणारे दाम्पत्य दाखल्यामुळे पोलिसांनी फार्मा कंपनीच्या प्रमुखाविरोधात दाखल केलेला गुन्हादेखील हायकोर्टाने (High Court) रद्द केला. 

मध्य प्रदेश हायकोर्टाचे न्या. सत्येंद्र कुमार सिंह यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने या प्रकरणी निकाल दिला. जाहिरातीचा उद्देश केवळ आपल्या उत्पादनाची जाहिरात करणे आहे. त्याशिवाय, कोणत्याही समूहाच्या धार्मिक भावना दुखावण्यााचा (Religious Sentiments) हेतू नाही, असे आढळून आले असल्याचे कोर्टाने म्हटले. कोर्टाने आपल्या निकालात म्हटले की, याचिकाकर्ता हा इंदूर येथील फार्मसी व्यावसायिक आहे. तो स्वत: हिंदू समाजातील आहे. त्याने केलेली पोस्ट लक्षात घेता, त्याचा त्यामागे कोणताही चुकीचा हेतू नसल्याचे दिसून येते. जाहिरातीच्या माध्यमातून अश्लीलता पसरवली जात असल्याचा आरोपही कोर्टाने फेटाळून लावला. 

पोस्ट केलेल्या जाहिरातीचे निरीक्षण करता त्यातील मजकूर अश्लील नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे माहिती आणि तंत्रज्ञान कायदा 67 (IT Act)नुसार, कारवाई होऊ शकत नाही, असेही कोर्टाने म्हटले. खटला चालवावा, इतके भक्कम पुरावे नाहीत. त्यामुळे हा गुन्हा रद्द करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. 

महेंद्र त्रिपाठी यांच्याविरोधात भादंवि कलम 505, 295ए आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याविरोधात त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. त्रिपाठी यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये नवरात्रोत्सवादरम्यान जोडप्यांसाठी मोफत कंडोम आणि गर्भधारणा चाचणी किटची जाहिरात पोस्ट केली होती. त्याने गरबा खेळणाऱ्या जोडप्याची प्रतिमा वापरली होती आणि ती जाहिरात व्हॉट्सअॅप ग्रुपवर आणि फेसबुकवरही पोस्ट केली होती.

त्यानंतर त्रिपाठी यांच्याविरोधात भावना दुखावली  असल्याचा आरोप करत एफआयआर नोंदवण्यात आला होता. त्यानंतर त्रिपाठी यांनी कोर्टात धाव घेतली. आपण स्वतः हिंदू आहेत आणि धार्मिक गटांमधील कोणत्याही प्रकारचे शत्रुत्व वाढवण्याचा किंवा धार्मिक भावना दुखावण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता, असा युक्तीवाद त्यांनी कोर्टात केला. गरबा कालावधीत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही जाहिरात पोस्ट केल्याचा दावाही त्यांनी केला. कंडोम उत्पादन करणाऱ्या विविध कंपन्यांनी ऑफर लाँच केली होती. 

आपल्या आदेशात हायकोर्टाने सलमान खान प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा संदर्भ दिला. नवरात्रौत्सवात 'लव्हरात्री' नावाचा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सलमान खानला परवानगी देण्यात आली होती. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात

व्हिडीओ

Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली
Akshay Kumar Car Accident : जूहूत 3 गाड्यांचा अपघात, अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या कारला धडक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Pune Shivsena UBT: सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
Embed widget