एक्स्प्लोर

फसवणुकीची तीन दिवसात तक्रार करा, नंतर जबाबदारी बँकेची!

बँका अनेकदा हात वर करतात, ज्यामुळे ग्राहक हतबल असतात. मात्र आरबीआयने आता ग्राहकांना सतर्क करत तीन दिवसांच्या आत तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे.

मुंबई : डिजिटल व्यवहारांमधील वाढत्या फसवणुकींबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना सतर्क केलं आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फसवणूक झाल्यास कसलीही चिंता न करता तीन कार्यालयीन दिवसांच्या आत बँकेत तक्रार करा, त्यानंतर जबाबदारी बँकेची असेल, असं आरबीआयने म्हटलं आहे. सरकारकडून ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. मात्र यासोबतच फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. बँका अनेकदा हात वर करतात, ज्यामुळे ग्राहक हतबल असतात. मात्र आरबीआयने आता ग्राहकांना सतर्क करत तीन दिवसांच्या आत तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे. आरबीआयने आजपासून देशभरात वित्तीय साक्षरता आठवड्याची सुरुवात केली आहे. एटीएमचे अयशस्वी व्यवहार, ग्राहकांना पूर्वसूचना न देताच खात्यावर शुल्क आकारणं याबाबतीत ग्राहक आपल्या शाखेत तक्रार करु शकतात, असं आरबीआयने सांगितलं. एका महिन्याच्या आत तक्रारीचं निवारण न झाल्यास बँकिंग लोकपालच्या समक्ष तक्रार करता येईल. चार ते आठ जून दरम्यान चालणाऱ्या या कार्यक्रमात बँक आणि ग्राहक यांच्यात आर्थिक सेवा, डिजिटल माध्यमांचा उपयोग यासह विविध गोष्टींबाबत जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे. भारत जगातला एकमेव देश आहे, जिथे अशा प्रकारची सेवा दिली जात आहे, असं आरबीआयने सांगितलं. वित्तिय साक्षरतेअंतर्गत बँक शाखांमध्ये बॅनर, पोस्टर यांच्या माध्यमातून सुरक्षित इलेक्ट्रॉनिक व्यवहार आणि डिजिटल बँकेच्या अनुभवासाठी ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षेच्या हमीवरही भर देण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Embed widget