Opeation Sindoor : ऑपरेशन सिंदूरवर भारताला पहिलं राजनैतिक यश, शशी थरूरांच्या नाराजीनंतर 'या' देशाचा सूर बदलला; पहिल्यांदा पाकिस्तानला पाठिंबा
Opeation Sindoor : 22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धच्या लढाईवर भारताची भूमिका मांडण्यासाठी भारतीय खासदारांचे एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ विविध देशांना भेट देत आहे.

Opeation Sindoor : शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली भारताने ऑपरेशन सिंदूरवर पाठवलेल्या शिष्टमंडळाला मोठे यश मिळाले आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांबद्दल कोलंबियाने शोक व्यक्त केला होता, आता त्यांनी अधिकृतपणे आपले विधान मागे घेतले आहे. शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे शशी थरूर यांनी चिंता व्यक्त केली होती आणि म्हटले होते की, कोलंबिया सरकारच्या प्रतिक्रियेमुळे आम्ही (भारत) थोडे निराश आहोत. भारतीय शिष्टमंडळाची भेट घेतल्यानंतर कोलंबियाचे उपपरराष्ट्र मंत्री योलांडा विलाविचेंसिओ म्हणाले, 'आज आम्हाला मिळालेल्या स्पष्टीकरणाबद्दल आम्हाला विश्वास आहे. काश्मीरमध्ये काय घडले याबद्दल आता आमच्याकडे असलेल्या सविस्तर माहितीच्या आधारे, आम्ही संभाषण सुरू ठेवू शकतो...'
शशी थरूर काय म्हणाले?
कोलंबियाने आपले पूर्वीचे विधान मागे घेतल्याबद्दल काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, 'कोलंबियाचे उपपरराष्ट्र मंत्री यांनी अतिशय विनम्रपणे आम्हाला सांगितले की त्यांनी ज्या विधानावर आम्ही चिंता व्यक्त केली होती ते विधान मागे घेतले आहे आणि ते या प्रकरणावरील आमची भूमिका पूर्णपणे समजून घेतात, जे आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे.'
An equally positive meeting followed at the Colombian Congress (National Assembly) with Alejandro Toro, President of the Second Commission of the Chamber of Representatives (the equivalent of our Foreign Affairs Committee) and Jaime Raul Salamanca, President of the Chamber of… pic.twitter.com/91uentRN3r
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) May 30, 2025
शशी थरूर यांनी कोलंबियाला नाराजी व्यक्त केली होती
22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धच्या लढाईवर भारताची भूमिका मांडण्यासाठी भारतीय खासदारांचे एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ विविध देशांना भेट देत आहे. सीमापार दहशतवादी कारवायांना पाकिस्तानचा पाठिंबा आणि दहशतवादाविरुद्ध भारताचा शून्य सहनशीलतेचा दृष्टिकोन व्यक्त करण्यासाठी थरूर कोलंबियाला शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. गुरुवारी कोलंबियाच्या राजधानीत पत्रकार परिषदेत थरूर यांनी दहशतवादाबाबत भारताची भूमिका स्पष्ट केली, 'ऑपरेशन सिंदूर' बद्दल बोलले आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याला कोलंबियाने दिलेल्या प्रतिसादाबद्दल निराशा व्यक्त केली.
इतर महत्वाच्या बातम्या























