परराज्यात 14 दिवसांचं क्वॉरंटाईन पूर्ण केलेल्या यूपीच्या मजुरांना परत आणणार : योगी आदित्यनाथ
परराज्यात अडकलेल्या उत्तर प्रदेशच्या मजुरांना स्वगृही आणण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठीच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
लखनौ : परराज्यात अडकलेल्या उत्तर प्रदेशच्या मजुरांना परत आणणार असल्याचं यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केलंय. योगी आदित्यनाथ यांनी मागील आठवड्यात राजस्थानातील कोटा इथे अडकलेल्या उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्यांना खास बसची सोय करुन आपापल्या घरी परत आणलं. त्यानंतर त्यांच्या या निर्णयाकडे गांभीर्याने पाहिलं जाऊ लागलंय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला त्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्रात त्यातही मुंबईत यूपीचे स्थलांतरीत मोठ्या संख्येने आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवाच केंद्राने राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी विशेष ट्रेन सोडाव्यात असं आवाहन केलं होतं. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हीच मागणी केंद्रसरकारकडे केली होती. मात्र, या दोघांच्याही मागणीनुसार आता विशेष ट्रेन सोडणं शक्य नसल्याचं केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं. त्यात आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच आपल्या राज्याच्या पण अन्य राज्यात असेलल्या स्थलांतरीत मजुरांना स्वतःच्या राज्यात आणण्याचं सूतोवाच केल्याने वेगवेगळ्या राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
coronavirus | कोरोनाबाधित रुग्ण डबल होण्याचा अवधी आता 10 दिवसांवर... : आरोग्यमंत्री हर्षवर्धन
महाराष्ट्रात युपीचे सर्वाधिक लोक मुंबईसह राज्याच्या अन्य भागात अडकलेले अनेक मजुरांनी काम बंद झाल्यावर मिळेल त्या मार्गाने, म्हणजे कंटोनर, दुधाचे टँकर वगैरेतून गाव जवळ करण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या येत आहेत. अनेकांनी तर चक्क चालत आपलं गाव जवळ केलं. परराज्यात अडकलेल्या मजुरांची तसंच तिथे 14 दिवसांचं आवश्यक क्वॉरंटाईन अवधी पूर्ण केलेल्या स्थलांतराची माहिती जमवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यांना टप्प्याटप्प्याने आपल्या राज्यात परत आणण्यासाठी वेगवेगळे पर्याय पडताळून पाहिले जात आहेत.
बुलेट ट्रेन प्रकल्पाला स्थगिती देण्याऐवजी महागाई भत्त्यात कपात करणं असंवेदनशील : राहुल गांधी
बाहेरुन आलेल्या नागरिकांना आधी क्वॉरंटाईन करणार सध्या परराज्यात असलेल्या यूपीच्या मजुरांना यूपीच्या सीमेपर्यंत आणल्यानंतर त्याचं टेस्टिंग होईल. टेस्टच्या अहवालानुसार या मजुरांना जिल्ह्याच्या ठिकाणी 14 दिवसाचं क्वॉरंटाईन अवधी पूर्ण केल्यानंतरच त्यांना त्यांच्या मूळ गावी जाता येईल. यापद्धतीने क्वॉरंटाईन अवधी पूर्ण केलेल्या मजुरांना दैनंदिन गरजेच्या वस्तू तसंच शिधा आणि रु. एक हजार रोख देण्यात येतील, असंही मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या आढावा बैठकीत ठरल्याचं सांगितलं जातंय.
PM interacts with Sarpanch | पंतप्रधान मोदींचा सरपंचांशी संवाद; ई-ग्राम स्वराज अॅप, स्वामित्त्व योजना सुरु