एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जयललितांच्या प्रकृतीसंदर्भातील गोंधळ उद्यापर्यंत दूर करा : हायकोर्ट
चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या प्रकृतीबाबत गूढ एवढं वाढलं आहे की, या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला आदेश द्यावा लागला आहे. मुख्यमंत्री जयललिता यांच्या प्रकृतीसंदर्भात निर्माण झालेला गोंधळ एक दिवसात दूर करा, असा आदेश मद्रास हायकोर्टाने दिला आहे.
68 वर्षीय जयललिता यांच्या आरोग्यासंदर्भात अफवा पसरत आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे तामिळनाडूतील जनतेमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.
सामाजिक कार्यकर्ते रामास्वामी यांनी याबाबत जनहित याचिका दाखल केली होती. जयललिता यांची तब्येत कशी आहे, यासंदर्भात जनतेला माहिती हवीय, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. त्यामुळे हायकोर्टाच्या आदेशानंतर तामिळनाडू सरकारचे वकील बुधवारी जयललिता यांच्या प्रकृतीबाबतचा अहवाल मद्रास हायकोर्टात सादर करणार आहेत.
जयललिता यांना 22 सप्टेंबर रोजी ओपोला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर इन्फेक्शन झाल्याने जयललितांवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं रविवारी सांगण्यात आलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement