एक्स्प्लोर
‘शुजात बुखारी लक्षात आहे ना’, भाजप नेत्याची पत्रकारांना धमकी
जम्मू काश्मीरातील भाजप आमदार चौधरी लाल सिंह यांनी पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येचा दाखला देत पत्रकारांनी मर्यादा ओलांडू नये, अशी थेट धमकी दिली आहे. आमदार चौधरी लाल सिंह हे याआधी कठुआ बलात्कार प्रकरणातील आरोपींची पाठराखण केल्याने चर्चेत आले होते.
श्रीनगर : जम्मू काश्मीरातील भाजप आमदार चौधरी लाल सिंह यांनी पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येचा दाखला देत पत्रकारांनी मर्यादा ओलांडू नये, अशी थेट धमकी दिली आहे. आमदार चौधरी लाल सिंह हे याआधी कठुआ बलात्कार प्रकरणातील आरोपींची पाठराखण केल्याने चर्चेत आले होते.
कठुआ बलात्कार प्रकरण आणि जम्मू-काश्मीरमध्ये आत्ता तयार झालेल्या स्थितीबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार चौधरी लाल सिंहांनी पत्रकारांना ही धमकी दिली आहे. ते म्हणाले,“काश्मीरच्या पत्रकारांनी चुकीचे वातावरण तयार केले होते. आता तर मला काश्मीरच्या पत्रकारांना सांगायचं आहे, आपल्या मर्यादेतच राहा. असं राहा जसं बुखारींसोबत झाले आहे.”
काही दिवसांपूर्वी ‘रायझिंग काश्मीर’चे संपादक शुजात बुखारी यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. काश्मीरबाबत मध्यममार्गी भूमिका घेत संतुलित लिखाण करण्यासाठी पत्रकार बुखारी ओळखले जात.
कठुआ बलात्कार प्रकरणात आरोपींची पाठराखण
जम्मू-काश्मीरातील कठुआ येथे 8 वर्षांच्या मुलीवर सामुहिक बलात्कार करुन तिची हत्या केली गेली होती. या संतापजनक प्रकरणाने अख्खा देश हादरुन गेला होता. पण तेव्हा मेहबूबा मुफ्ती सरकारमध्ये मंत्री असलेल्या भाजपच्या चौधरी लाल सिंह यांनी बलात्कारातील आरोपींच्या समर्थनासाठी रॅली काढली होती. यामुळे देशभरातून त्यांच्यावर टीका झाली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement