एक्स्प्लोर

चीनच्या हेरगिरीबाबत चौकशीचे आदेश, एक्सपर्ट कमिटी महिनाभरात देणार रिपोर्ट

चीनकडून केवळ एलएसीवरच नाही तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील भारताविरोधात कारस्थान रचलं जात असल्याचं समोर आलं आहे. चीनच्या हेरगिरीबाबत भारत सरकारकडून आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

नवी दिल्ली: भारतामध्ये चीनच्या हेरगिरीबाबत मोठी खळबळजनक माहिती उघड झाली. चीनकडून आता केवळ एलएसीवरच नाही तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील भारताविरोधात कारस्थान रचलं जात आहे. आता चिनी कंपनीच्या भारतात हेरगिरीबाबत सरकारनं चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणात नॅशनल सायबर सेक्युरिटी कोऑर्डिनेशनच्या नेतृत्वात एक एक्सपर्ट कमिटी तयार केली आहे. ही कमिटी 30 दिवसांच्या आता रिपोर्ट सरकारला देणार आहे. चीनच्या शेनझेन आणि झेन्हुआ इन्फोटेक या कंपनीकडून हेरगिरी होत असल्याचा मुद्दा भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं चीनच्या राजदुतांसमोर मांडला. या चिनी कंपनीकडून भारतातील प्रमुख लोकांची हेरगिरी केली जात असल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

चीनकडून भारतातील मोठ्या संविधानिक पदांवरील राजकीय नेते तसेच लष्करातील बड्या अधिकाऱ्यांची हेरगिरी सुरु असल्याचं हे प्रकरण आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, प्रमुख विरोधी पक्षनेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश यांच्यासह सुमारे 1350 लोकांची हेरगिरी सुरु असल्याची माहिती आहे. एवढंच नाही तर चीन भारतीय अर्थव्यवस्थेवरही लक्ष ठेवून असल्याची माहिती आहे. भारतातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपाठोपाठ चीन भारतातील स्टार्टअप अॅप्स आणि ई-कॉमर्स कंपन्यांवरही पाळत ठेवत असून पेमेंट अॅप्स, सप्लाय चैन, डिलीवरी अॅप्स आणि या अॅप्सचे सीईओ-सीएफओसह जवळपास 1400 व्यक्ती आणि संस्थांवर पाळत ठेवून असल्याची माहिती समोर आली आहे.

एलएसीवर चीनसोबतच भारतीय सैनिकांचा कोरोनाशीही लढा

देशभरातील बड्या व्यक्तींची हेरगिरी चीनकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पाच मंत्री, माजी आणि आजी 40 मुख्यमंत्री, 350 खासदार, कायदेतज्ञ, आमदार, महापौर, सरपंच आणि लष्करातील काही अधिकारी अशा जवळपास 1350 लोकांची हेरगिरी सुरु आहे. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, दिग्दर्शक शाम बेनेगल यांच्यासह देशातील काही पत्रकारांचा देखील समावेश आहे, अशी माहिती आहे.

चीनची शेनझेन आणि झेन्हुआ इन्फोटेक करत आहे हेरगिरी

चीनची शेनझेन आणि झेन्हुआ इन्फोटेक ही कंपनी हेरगिरी करत असल्याची माहिती आहे. शेनझेन इन्फोटेक कंपनी ही हेरगिरी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या सरकारसाठी करत असल्याची माहिती आहे. या कंपनीचं काम दुसऱ्या देशांवर नजर ठेवणं आहे.

चीनचं कारस्थान! पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री ठाकरेंसह देशातील अनेक बड्या लोकांची हेरगिरी 

मुख्यमंत्री ठाकरेंसह 24 मुख्यमंत्र्यांचा समावेश

चीनच्या या कंपनीकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, दिल्लीचे उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासह सध्याच्या एकूण 24 मुख्यमंत्र्यांची हेरगिरी सुरु आहे. या लिस्टमध्ये 16 माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.

कोणकोणत्या लोकांची हेरगिरी? पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सीडीएस जनरल बिपीन रावत चीफ जस्टिस ऑफ इंडिया एसए बोबडे 24 मुख्यमंत्री 16 माजी मुख्यमंत्री 350 खासदार 70 महापौर

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Parliament March CJP: सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले
सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले
Dharmendra Pradhan resignation: दिल्लीत वेगवान हालचाली, धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला पोहोचले, केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देणार?
दिल्लीत वेगवान हालचाली, धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला पोहोचले, केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देणार?
Delhi Jantar Mantar Protest: दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Dharmendra Pradhan resignation: दिल्लीत वेगवान हालचाली, धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला पोहोचले, केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देणार?
दिल्लीत वेगवान हालचाली, धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला पोहोचले, केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देणार?
Kalyan Crime News:
"फ्लॅटमध्ये बाथरूमचा नळ सुरूये, तिथे एक डेड बॉडी...'', व्हाईस मेल ऐकताच घरमालकाच्या पायाखालची जमीन सरकली, दार उघडताच सगळेच चक्रावले
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
Delhi Parliament March CJP: सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले
सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले
Ketan Agrawal Case: केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
Samruddhi Mahamarg Accident : इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
Delhi Jantar Mantar protest: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Video: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Embed widget