Wang Yi India Visit : वादग्रस्त वक्तव्यानंतर चीनचे परराष्ट्रमंत्री अचनाक भारत दौऱ्यावर, डोभाल आणि जयशंकर यांची घेणार भेट
Chinese Foreign Minister India Visit: गुरुवारी अचानक वाग यी भारत दौऱ्यावर आले आहेत. भारत आणि चीन या देशाकडून वांग यी यांच्या दौऱ्याबाबत गुप्तता बाळगण्यात आली आहे.
Wang Yi India Visit : काश्मीरबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची चर्चा सुरु असतानाच गुरुवारी अचानक चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी भारत दौऱ्यावर आले आहेत. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, वांग यी शुक्रवारी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी चर्चा करणार आहेत. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी मंगळवारी पाकिस्तान दौऱ्यावर होते. त्यावेळी ओआईसीच्या बैठकीत त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर ते अचानक अफगाणिस्तानच्या दौऱ्यावर गेले होते. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार आल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा होता. गुरुवारी अचानक वाग यी भारत दौऱ्यावर आले आहेत. भारत आणि चीन या देशाकडून वांग यी यांच्या दौऱ्याबाबत गुप्तता बाळगण्यात आली आहे. वांग यी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार का? याबाबत अद्याप कोणतेही वृत्त समोर आलेले नाही.
सीमावादावर तोडगा शोधण्यासाठी चीन आणि भारत या दोन्ही देशांमध्ये राजनैतिक त्याचप्रमाणे लष्करी पातळीवरील वाटाघाटींच्या 14 फेऱ्याही झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भारत दौऱ्याविषयीची चर्चा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर चीनचे परराष्ट्रमंत्री भारतात दाखल झाल्याचे समजतेय. तसेच या बैठकीत चीन आणि युक्रेन वादामुळे निर्माण झालेल्या पेचासंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे.
#WATCH | Delhi: Chinese Foreign Minister Wang Yi arrives in India. He is likely to meet NSA Ajit Doval and EAM Dr S Jaishankar tomorrow pic.twitter.com/hU2G52CCa5
— ANI (@ANI) March 24, 2022
पाकिस्तानमधील ओआयसी परिषदेला हजेरी लावताना चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी जम्मू काश्मीरबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर भारतीयांना नाराजी व्यक्त केली होत्या. त्यांच्या वक्तव्यानंतर भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटली. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसण्याचा चीनला अधिकार नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने ठणकावले होते. एवढेच नव्हे तर भारत इतर देशांच्या अंतर्गत मुद्द्यांवर बोलण्याचे टाळतो, असा सूचक इशाराही देण्यात आला होता. भारताकडून चीनला खडसावल्यानंतर काही तासांतच वांग यी भारत दौऱ्यावर आले आहेत. भारताबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी वांग अचानक भारत दौऱ्यावर आल्याचं बोललं जात आहे.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live