एक्स्प्लोर

कुरघोडी करणाऱ्या चीनला उपरती, मोदींच्या नेतृत्त्वात भारत शक्तिशाली, 'ग्लोबल टाईम्स'मध्ये स्तुतीसुमनं!

नवी दिल्ली : चीनमधील सरकारी वृत्तपत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचं कौतुक करण्यात आले आहे. भारत जगात सर्वात वेगानं वाढणारी शक्ती, असल्याचं चीनने मान्य केलेय.

नवी दिल्ली : चीनमधील सरकारी वृत्तपत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचं कौतुक करण्यात आले आहे. भारत जगात सर्वात वेगानं वाढणारी शक्ती, असल्याचं चीनने मान्य केलेय. चीनमधील ग्लोबल टाइम्स वृत्तपत्राच्या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक आणि परराष्ट्र धोरणाच्या क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीचे कौतुक करण्यात आलेय. ग्लोबल टाइम्समध्ये शांघायच्या फुडन युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर साऊथ एशियन स्टडीजचे संचालक झांग जियाडोंग यांचा लेख छापण्यात आलाय. यामध्ये भारताने मागील चार वर्षांत केलेल्या कामगिरीचा उल्लेख करण्यात आलाय. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचं कौतुक करण्यात आले आहे. भारताची वेगानं होणारी आर्थिक वाढ, शहरी प्रशासनातील सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय संबंध, खासकरुन चीनसोबतच्या दृष्टिकोनातील बदलांबद्दल सविस्तर लिहिण्यात आलेय. 

झांग यांनी आपल्या लेखात उदाहरण देताना म्हटले की, "चीन आणि भारत यांच्यातील व्यापार असमतोलावर चर्चा करताना भारतीय प्रतिनिधींनी पूर्वी प्रामुख्याने व्यापार असमतोल कमी करण्यासाठी चीनच्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रित केले होते, परंतु आता ते भारताच्या निर्यात क्षमतेवर अधिक भर देत आहेत." वेगानं वाढणारा आर्थिक  आणि सामाजिक विकासासोबत रणनीतीबाबत भारत अधिक आत्मविश्वासाने काम करत आहे. आता भारत 'भारत नॅरेटिव्ह'वर जोर दतोय  आणि त्याला चालना देण्यास जास्त सक्रीय झालाय.

ग्लोबल टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या लेखात म्हटलेय की," राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात भारताने पाश्चिमात्य देशांसोबतच्या लोकशाही सहमतीवर जोर देण्याच्या पलीकडे जाऊन लोकशाही राजकारणाची 'इंडियन स्पेशिएलिटी' अधोरेखित करण्यास सुरुवात केली आहे. भारतामध्ये सध्या लोकशाही राजकारणावर अधिक भर दिला जात आहे." भारतात होत असलेला बदल हा ऐतिहासिक आहे. भारताने आपली प्रतिमा बदलण्यासोबत राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या 'विश्व गुरु' म्हणून काम करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा दिसते.
 
ग्लोबल टाईम्सच्या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाची प्रशंसा करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये अमेरिका, जपान आणि रशियासारख्या मोठ्या जागतिक महासत्तासोबत संबंध मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे. परराष्ट्र धोरणात भारताच्या धोरणात्मक विचारसरणीत आणखी एक बदल झाल्याचेही अधोरेखित करण्यात आलेय. भारत एक महान शक्ती आणि महासत्ताकडे वाटचाल करत आहे.

झांग यांनी ग्लोबल टाईम्समधील आपल्या लेखात म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा सत्ता संभाळली, त्यावेळी त्यांनी जपान, अमेरिका, रशिया आणि अन्य देशांसह क्षेत्रीय संगठणासोबत भारताच्या संबंध सुधारण्यावर भर दिला, त्यासाठी खास रणनितीचा वापर केला. भारताने नेहमीच स्वत:ला जागतिक शक्ती मानलं. 

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्त्र म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले

Embed widget