France Riots: फ्रान्समध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराला थांबवण्यासाठी योगींना आमंत्रण, तर 'फिरंग्यांच्या कौतुकासाठी भुकेले', ओवैसी यांची खोचक टीका
France Riots: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाकडून फ्रान्समध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावर ट्वीट करण्यात आले आहे. तर त्यावर ओवैसी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
France Riots: फ्रान्समध्ये (France) सुरु असलेला हिंसाचार थांबण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना आमंत्रण आले आहे. फ्रान्समधील एका व्यक्तीने ट्वीट करत फ्रान्समधील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी योगी आदित्यनाथ यांना तात्काळ फ्रान्समध्ये पाठवण्यात यावे असं म्हटलं आहे. तर त्यावर योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाकडून देखील उत्तर देण्यात आले आहे.
याोगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाकडून ट्वीट करत म्हटले आहे की, 'जगाच्या कोणत्याही भागात जेव्हा हिंसाचार होतो, दंगली होतात किंवा अराजकता माजवली जाते तेव्हा जगात शांतता प्रस्थापित केली जाण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच उत्तर प्रदेशात महाराजांनी स्थापन केलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी योगी मॉडेलचा देखील विचार केला जातो.'
ओवैसी यांची खोचक टीका
मुख्यमंत्री योगी यांच्या कार्यालयाने केलेल्या या ट्वीटवर सध्या माध्यमांमधून बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. यावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी देखील ट्वीट करत खोचक टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, 'फिरंग्यांच्या स्तुतीचे इतके भुकेले आहेत की ते कोणत्यातरी फेक अकाउंटच्या ट्वीटने खुश होतात? खोट्या चकमकी, बेकायदेशीर बुलडोझर कारवाया आणि दुर्बलांना लक्ष्य करणे हे परिवर्तनवादी धोरण नसून लोकशाहीचा ऱ्हास आहे. लखीमपूर खेरी आणि हाथरसमध्ये आम्ही “योगी मॉडेल” चे सत्य पाहिले होते.'
फ्रान्समधील एन जॉन कॅम या ट्विटर अकाऊंटवरुन योगी आदित्यनाथ यांच्यासाठी ट्वीट करण्यात आले आहे. त्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'भारताने फ्रान्समधील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवले पाहिजे. ते 24 तासामध्ये तिथली स्थिती नियंत्रणात आणतील.'
योगी आदित्यनाथ यांच्यासाठी करण्यात आलेले हे ट्वीट खरचं फ्रान्समधून करण्यात आले आहे का? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. त्यामुळे त्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ट्वीटवर सध्या विरोधकांकडून टीका कऱण्यात येत आहे.
भाई, भाई, भाई! फिरंगियों की तारीफ़ के इतने भूके हैं की किसी फर्जी अकाउंट के ट्वीट से खुश हो रहे हैं?! झूठे एनकाउंटर, ग़ैर-क़ानूनी बुलडोज़र कार्यवाही और कमज़ोरों को निशाना बनाना कोई परिवर्तनकारी नीति नहीं है, ये जम्हूरियत का विनाश है। “योगी माडल” का सच तो हमने लखीमपुर खीरी और… https://t.co/UV0S3jcWrB
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) July 1, 2023
हे ही वाचा :
'असं पाकिस्तानातील हिंदूसोबत देखील व्हायला हवं', नेमकं असं काय म्हणाला पाकिस्तानातील हा हिंदू तरुण?