मोठी बातमी: ममता बॅनर्जी ट्रेडमिलवर चालताना घसरुन पडल्या, डोक्याला गंभीर दुखापत
Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गंभीर जखमी झाल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री संध्याकाळी घरी ट्रेडमिलवर चालत असताना कोसळल्या.
#WATCH | West Bengal CM and TMC chairperson Mamata Banerjee admitted to SSKM Hospital in Kolkata. Party says that she sustained "a major injury" pic.twitter.com/EHnIvOeyuI
— ANI (@ANI) March 14, 2024
जानेवारी महिन्यातही झाल्या होत्या जखमी
चालू वर्षातील जानेवारी महिन्यातही ममता बॅनर्जी यांना अपघात झाला होता. वर्धमानकडून कोलकाताकडे परतत असताना हा त्या जखमी झाल्या होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार पावसामुळे ममता बॅनर्जी परतत होत्या. यावेळी कारचा ब्रेक लावल्यानंतर डोक्याला दुखापत झाली होती. ममता यांच्या ताफ्यात आणखी काही कार आल्याने ड्रायव्हरला अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती.
2021 मध्ये पायाला झाली होती दुखापत
ममता बॅनर्जी यांना यापूर्वी अनेकदा अपघातांना आणि दुखापतींना सामोरे जावे लागले आहे. 2021 मध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर महिने उपचार सुरु होते. हा अपघात झाला तेव्हा पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका सुरु होत्या. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम येथील आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती. दरम्यानच्या काळात त्यांना अपघात झाला होता. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती.
2023 मध्येही झाली होती दुखापत
ममता बॅनर्जी यांना 2023 मध्येही अपघात झाला होता. हा अपघात सिलीगुडी येथे झाला होता. त्यांच्या हॅलिकॉप्टरची एमरजन्सी लँडिग करावी लागली होती. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. शिवाय डाव्या गुडघ्याला आणि पाठीलाही काही जखमा झाल्या होत्या.
Our chairperson @MamataOfficial sustained a major injury.
— All India Trinamool Congress (@AITCofficial) March 14, 2024
Please keep her in your prayers 🙏🏻 pic.twitter.com/gqLqWm1HwE