Youtuber Devraj patel dies : धक्कादायक! प्रसिद्ध कॉमेडी यूट्यूबर देवराज पटेलचा रस्ते अपघातात मृत्यू, चाहत्यांवर शोककळा
प्रसिद्ध कॉमेडी यूट्यूबर देवराज पटेल (Youtuber Devraj patel) याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.
Youtuber Devraj patel dies : छत्तीसगडमधील प्रसिद्ध कॉमेडी यूट्यूबर देवराज पटेल (Youtuber Devraj patel) याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. भरधाव वेगानं आलेल्या ट्रकने देवराज पटेलच्या दुचाकीला मागून धडक दिली. यामध्ये देवराज पटेलचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना रायपूरच्या तेलीबंधा पोलीस स्टेशन परिसरात घडली. देवराजचं 'दिल से बुरा लगता है', हे वाक्य नेटकऱ्यांनी चांगलंच डोक्यावर घेतलं होतं. देवराजच्या जाण्यानं त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
“दिल से बुरा लगता है” से करोड़ों लोगों के बीच अपनी जगह बनाने वाले, हम सबको हंसाने वाले देवराज पटेल आज हमारे बीच से चले गए.
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) June 26, 2023
इस बाल उम्र में अद्भुत प्रतिभा की क्षति बहुत दुखदायी है.
ईश्वर उनके परिवार और चाहने वालों को यह दुःख सहने की शक्ति दे. ओम् शांति: pic.twitter.com/6kRMQ94o4v
भरधाव असलेल्या ट्रकने देवराजच्या बाईकला मागील बाजूने धडक दिली. या धडकेत देवराजचं जागीच निधन झालं. ही घटना सोमवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. देवराजची अकाली एक्झिट ही मनाला चटका लावणारी आहे. देवराजच्या निधनावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी देवराजचा एक व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे. यामध्ये देवराज पटेल हा छत्तीगड मध्ये दोनच लोक फेमस आहेत, एक मी आणि एक म्हणजे आमचे काका असे म्हणताना दिसत आहे. मृत्यूच्या काहीच तास आधीच देवराज पटेलने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला होता. मिळालेल्या माहितीनुसार देवराज पटेल हा रील शूट करण्यासाठी नवे रायपूर येथे आला होता. परतीच्या प्रवासाच्या वेळी हा अपघात घडला. देवराज हा अवघ्या 21 वर्षाचा होता. सध्या तो बीएच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होता.
देवराज पटलने त्याच्या व्हिडिओंसाठी 'दिल से बुरा लगता है' ही पंच लाईन वापरली. देवराज पटेल याने मृत्यूच्या चार तास आधी एक व्हिडीओ बनवून पोस्ट केला होता. व्हिडीओमध्ये त्याने सर्वांना अलविदा असं म्हटलं आहे. देवराज पटेलने 2021 मध्ये प्रसिद्ध यूट्यूबर भुवन बाम सोबत कॉमेडी वेब सिरीज धिंडोरा मध्ये काम केलं होतं. देवराज याच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केलं आहे.