Congress : गोव्यानंतर छत्तीसगडमध्येही काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळी, टीएस सिंहदेव यांचा मंत्रिपदाचा राजीनामा
TS Singh Deo, Congress : राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. त्यापैकी छत्तीसगड काँग्रेसमध्ये ऑल इज ओके नसल्याचं चित्र आहे.

TS Singh Deo, Congress : गोव्यानंतर छत्तीसगड राज्यातील काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर आला आहे. राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. त्यापैकी छत्तीसगड काँग्रेसमध्ये ऑल इज ओके नसल्याचं चित्र आहे. कारण छत्तीसगड काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीचा उद्रेक समोर आला आहे. शनिवारी ग्रामविकास मंत्री आणि मुख्यमंत्रीपदाची मनीषा बाळगणारे टी एस सिंह देव यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आता हे बंड कुठल्या वळणावर जाणार? याची चर्चा सुरु झाली आहे. गोव्याप्रमाणे छत्तीसगडमध्ये काही राजकीय हलचाली होणार का? याची चर्चा रंगली आहे.
टी एस सिंह देव यांच्या राजीनाम्यानंतर भूपेश बघेल मंत्रिमंडळात सर्व काही ठिक नसल्याचं समोर आले आहे. तर छत्तीसगडच्या राजकारणात भूंकप येऊ शकतो. सुत्रांच्या माहितीनुसार, पंचायत राज विभागाचे मंत्री टीएस सिंहदेव यांना विश्वासात न घेता त्यांच्या विभागाचे निर्णय घेतले जात होते. त्यामुळे टीएस सिंहदेव नाराज होते. त्यातूनच त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
त्रिभुवनेश्वर शरण सिंहदेव यांच्याकडे पंचायत आणि ग्रामीण विकास, लोक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, एवं परिवार कल्याण, वैद्यकीय शिक्षण, व्यावसायिक कर (जीएसटी) यांचा कारभारही होता. सिंहदेव यांनी ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळीचे ग्रहण सुटता सुटेना
— Prashant Kadam (@_prashantkadam) July 16, 2022
आता देशात ज्या दोन राज्यात सत्ता उरली आहे त्यापैकी छत्तीसगडमध्येही अंतर्गत नाराजीचा उद्रेक
ग्रामविकास मंत्री आणि मुख्यमंत्रीपदाची मनीषा बाळगणारे टी एस सिंह देव यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय
हे बंड कुठल्या वळणावर जाणार?
पंचायतराज विभागामध्ये ढवळा ढवळ केल्यामुळे नाराज -
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचायतराज विभागामध्ये ढवळा ढवळ केल्यामुळे नाराज सिंहदेव नाराज होते. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनाचे दहा हजार पेक्षा जास्त मनरेगा कर्मचारी राजधानी दिल्लीमध्ये मागील दोन मिहन्यांपासून प्रदर्शन करत होते. राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांच्या सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांवर कारवाई केली. 21 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यापूर्वी मंत्रि सिंहदेव यांना विचारण्यातही आले नव्हते. काही दिवसांपूर्वी या सर्वांना पुन्हा कामावर रुजू करण्यात आले, तेव्हाही त्यांना विचारण्यात आले नाही. या सर्व प्रकारामुळे सिंहदेव नाराज होते.





















