एक्स्प्लोर

Chhattisgarh Election 2018 : दुसऱ्या टप्प्यात 72 जागांसाठी मतदान

छत्तीसगडच्या सत्तारुढ भाजप मंत्रिमंडळातील नऊ मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष आणि काँग्रेसच्या काही महत्त्वाच्या नेत्यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.

रायपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण 19 जिल्ह्यांतील 72 जागांसाठी मतदान पार पडत आहे. एक हजारापेक्षा जास्त उमेदवार यावेळी रिंगणात असून विधानसभा निवडणुकांचे निकाल 11 डिसेंबरला जाहीर होतील. एक लाख 54 हजार 596 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. छत्तीसगडच्या सत्तारुढ भाजप मंत्रिमंडळातील नऊ मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष आणि काँग्रेसच्या काही महत्त्वाच्या नेत्यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत साडेबारा टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 72 जागांसाठी भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी 72 उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय आप (68), जनता काँग्रेस (अजित जोगी) (47), आंबेडकर पार्टी ऑफ इंडिया (एपीआय) (40), बसप (27), इतर (229), अपक्ष (493) उमेदवार निवडणूक लढवत आहेत. एकूण 1 हजार 79 उमेदवार रिंगणात असून यामध्ये 111 महिला उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात 90 पैकी 18 मतदारसंघांमध्ये मतदान झालं. नक्षलग्रस्त भागातील आठ जिल्ह्यात मुख्यमंत्री रमणसिंह यांच्यासह 190 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. रमणसिंह सरकार छत्तीसगड विधानसभेच्या 90 जागांपैकी 65 हून अधिक जागा जिंकत सलग चौथ्यांदा सरकार स्थापन करण्याचं भाजपचं उद्दिष्ट आहे. रमणसिंह सलग तिसऱ्यांदा सीएमच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत. चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात घालण्यास ते उत्सुक आहेत. तर काँग्रेस 15 वर्षांनंतर छत्तीसगडची सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. छत्तीसगडमधील चित्र काय? छत्तीसगड विधानसभेत 90 आणि लोकसभेच्या 11 जागा आहेत. 2013 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 49 आणि काँग्रेसने 39 जागांवर विजय मिळवला होता. तर 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत 10 जागा भाजपला आणि काँग्रेसला एक जागा मिळाली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines Superfast News 8PM 07 July 2024Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ

''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप

जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण

Embed widget