Chhattisgarh Accident : पीकअप पलटी होऊन भीषण अपघात, 17 आदिवासी बांधवांवर काळाचा घाला, छत्तीसगडमधील घटना
Chhattisgarh accident : छत्तीसगडमधील (Chhattisgarh) कावर्धा जिल्ह्यात आज (दि.20) पीकअप पलटी होऊन भीषण अपघात झालाय.
Chhattisgarh accident : छत्तीसगडमधील (Chhattisgarh) कावर्धा जिल्ह्यात आज (दि.20) पीकअप पलटी होऊन भीषण अपघात झालाय. या अपघातात 17 लोकांचा मृत्यू झालाय, तर 10 ते 12 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. आदिवासी बांधव जंगलातून पारंपारिक पानं घेऊन परतत होते. यावेळी हा अपघात झालाय. पीकअपमधील सर्वजण कुई येथील राहिवासी असल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलय. बहपानी भागात आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने पीकअप 20 फूट खोल दरीत कोसळली असल्याचे सांगण्यात येत आहे.
#UPDATE | Chhattisgarh | 17 people died after a pick-up vehicle overturned near the Kawardha area: Abhishek Pallav, Kawardha SP.
— ANI (@ANI) May 20, 2024
छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
कावर्धा जिल्ह्यात भीषण अपघात घडल्यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी शोक व्यक्त केलाय. ट्वीटरवरुन त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. विष्णूदेव साय यांनी लिहिले, कबीरधाम जिल्ह्यातील कुकदूर क्षेत्रात बाहपानी गावाजवळ पीकअप पलटी होऊन 17 ग्रामस्थांचा मृत्यू झालाय. पीकमध्ये जवळपास 20 ते 25 लोक होते. तर 4 जण जखमी झाल्याची दु:खद घटना घडली. जखमींवर उपचार व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत. ईश्वर मृत्यांच्या आत्म्याला शांती देवो. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. मी जखमींच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे.
Chhattisgarh Deputy CM Vijay Sharma says, "The news of the death of 15 people due to the overturning of a pick-up vehicle full of workers in Kawardha is extremely painful. My condolences are with all the families who have lost their loved ones in this accident. Along with this,… https://t.co/F2Flvs6Qui pic.twitter.com/WH8FD9kEwL
— ANI (@ANI) May 20, 2024
कावर्धा येथे कामगारांनी भरलेले पिकअप वाहन उलटल्याने 15 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत क्लेशदायक आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्या सर्व कुटुंबांसोबत माझ्या संवेदना व्यक्त करत आहे, असे छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा म्हणाले आहेत.
कबीरधाम जिले के कुकदूर थाना क्षेत्र के बाहपानी गांव के पास पिकअप पलटने से 18 ग्रामीणों के निधन एवं 4 के घायल होने का दुःखद समाचार प्राप्त हो रहा है।
— Vishnu Deo Sai (Modi Ka Parivar) (@vishnudsai) May 20, 2024
घायलों के बेहतर इलाज के आवश्यक निर्देश ज़िला प्रशासन को दिए गए है।
ईश्वर से दिवंगत आत्माओं की शांति और उनके परिवार के प्रति…
इतर महत्वाच्या बातम्या