(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ShivJayanti 2021 : शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींकडून खास व्हिडीओ पोस्ट, राहुल गांधींचंही शिवरायांना अभिवादन
शिवजयंतीच्या निमित्ताने राज्यातील आणि देशातील महत्वाच्या नेत्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक खास व्हिडीओ शेअर करुन देशवासियांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ShivJayanti 2021 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त नमन केलं आहे. नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवरायांवरील भाषणाचा एक आपला जुना व्हिडीओ शेअर केला आहे. दुसरे 'शिवाजी' कोणी होऊ शकत नाही पण 'सेवाजी' मात्र होऊ शकतो असं सांगत सेवेचं महत्व अधोरेखित केलंय. पंतप्रधान मोदींनी आपल्या संदेशात म्हटलंय की, भारत मातेचे सुपुत्र छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त नमन. त्यांचे साहस, अद्भुत शौर्य आणि असाधारण बुद्धीमत्ता अनेक युगे देशवासियांना प्रेरित करतील.
मां भारती के अमर सपूत छत्रपति शिवाजी महाराज को उनकी जयंती पर शत-शत नमन। उनके अदम्य साहस, अद्भुत शौर्य और असाधारण बुद्धिमत्ता की गाथा देशवासियों को युगों-युगों तक प्रेरित करती रहेगी। जय शिवाजी! pic.twitter.com/3vhVgBYp5R
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2021
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शौर्य, साहस आणि पराक्रमाचे प्रतिक असलेल्या शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा असे राहुल गांधींनी आपल्या संदेशात म्हटलंय.
शौर्य, साहस और पराक्रम के प्रतीक छत्रपति शिवाजी महाराज की जयंती पर आप सभी को शुभकामनाएँ। pic.twitter.com/L2TQ6stUie
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 19, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यातील आणि देशातील जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलंय की, "जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!"
जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!#शिवजयंती pic.twitter.com/ehu9duNpyV
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 19, 2021
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही देशवासियांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय की, "छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त मी त्यांचे स्मरण करतो. ते एक योद्धा, प्रतापी सेनानायक, कुशल प्रशासक आणि लोककल्याणकारी शासक होते. शिवाजी महाराजांनी नेहमी जनहित, राजहित आणि राष्ट्रहितालसाठी काम केलंय. त्यांचे जीवन सर्व भारतीयांसाठी गौरव आणि प्रेरणेचा स्रोत आहे."
छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के अवसर मैं उन्हें स्मरण एवं नमन करता हूँ। वे एक महान योद्धा, प्रतापी सेनानायक, कुशल प्रशासक एवं प्रजापालक शासक थे।
शिवाजी महाराज ने हमेशा जनहित, राजहित और राष्ट्रहित में काम किया। उनका सारा जीवन हर भारतवासी के लिए गौरव और प्रेरणा का स्रोत है। — Rajnath Singh (@rajnathsingh) February 19, 2021
खासदार संभाजीराजे छत्रपतींनी शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना आपल्या संदेशात म्हंटलंय की, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाने भारतभूमी पवित्र झाली. सुमारे तीनशे वर्षांच्या प्रदीर्घ अंधाऱ्या रात्रीनंतर महाराष्ट्र भूमीवर स्वराज्याचा उष:काल झाला. दूरदृष्टी, असीम धैर्य, परिस्थितीचे अचूक मूल्यमापन, प्रबळ इच्छा आणि प्रभावी व्यक्तिमत्वाच्या बळावर सार्वभौम राष्ट्राची निर्मिती करणाऱ्या या महान राष्ट्रपुरुषास त्रिवार मुजरा !!!"
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाने भारतभूमी पवित्र झाली.
सुमारे तीनशे वर्षांच्या प्रदीर्घ अंधाऱ्या रात्रीनंतर महाराष्ट्र भूमीवर स्वराज्याचा उष:काल झाला. दूरदृष्टी, असीम धैर्य, परिस्थितीचे अचूक मूल्यमापन, प्रबळ इच्छाशक्ती व आपल्या मुत्सद्दी... (1/2) pic.twitter.com/t6Sepv6EVk — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 19, 2021
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय की, "रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा."
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा ।। जय जिजाऊ जय शिवराय ।।#ChhatrapatiShivajiMaharaj#शिवजयंती२०२१ pic.twitter.com/hxO9HLigOf
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 19, 2021
मनसे अधिकृतच्या ट्विटर खात्यावरुन शिवजयंतीच्या आगळ्या-वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देताना एक व्हिडीओ शेअर केला आहे. राज ठाकरेंच्या आवाजातील या व्हिडीओमध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या सिंहगडावरील भेटीसंबंधी घटना सांगण्यात आली आहे.
ह्या हिंदभूमीवरील स्वातंत्र्य योद्ध्यांची प्रेरणा म्हणजे शिवछत्रपती... कालही, आजही आणि उद्याही! #रयतेचाराजा #शिवछत्रपती #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रधर्म #स्वातंत्र्यसूर्य pic.twitter.com/WO0OVUzBZB
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 19, 2021
In Pics: शिवरायांचे बलाढ्य किल्ले हीच खरी स्मारकं, संवर्धनाची गरज