एक्स्प्लोर
देशभरातील मेडिकल आज बंद, औषधविक्रेत्यांचा संप
गुरुवार मध्यरात्री 12 वाजल्यापासून शुक्रवार मध्यरात्री 12 वाजेपर्यंत देशभरातील औषधांची सर्व दुकानं बंद राहणार आहेत.

मुंबई : औषधांची ऑनलाईन विक्री आणि ई-फार्मसीविरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांनी आज (शुक्रवारी) एक दिवसीय संप पुकारला आहे. 'ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट' (एआयओसीडी) या देशभरातील केमिस्ट्स आणि वितरकांच्या सर्वात मोठ्या कंपनीने बंदची हाक दिली आहे. गुरुवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सर्व औषधांची दुकानं बंद राहणार आहेत.
या संपात मुंबईतील साडेसहा हजार औषध विक्रेते सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील 60 हजार, तर देशातील साडेआठ लाख औषध विक्रेते बंदमध्ये सहभागी होणार आहेत. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट, महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, द रिटेल अँड डिस्पेन्सिंग केमिस्ट असोसिएशनचा यात सहभाग आहे.
केंद्र सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून औषधांची विक्री करण्याचा दिलेला कोणताही आदेश किंवा ई-फार्मसीजना भारतात कोणत्याही स्वरुपात कार्य करण्याची दिलेली मुभा यांचा निषेध करण्यासाठी भारतातील सर्व केमिस्ट्सनी एक दिवसाचा बंद पुकारला आहे.
औषधांची ऑनलाईन विक्री केल्यास ग्राहकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात विपरित परिणाम होऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशाच्या तंत्रज्ञानप्रेमी तरुण पिढीचं कधीच भरुन न येणारे नुकसान होऊ शकतं, असं एआयओसीडीने म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
भारत
मुंबई
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
