एक्स्प्लोर
भीमा कोरेगावप्रकरणी छत्रपती संभाजीराजे यांचं राज्यसभेत निवेदन
'मी महाराष्ट्रातील जनतेला काही सांगू इच्छितो, कारण की, मी त्या घराण्यातील आहे. शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमीत जो प्रकार घडला आहे तो निंदनीय आहे.'
![भीमा कोरेगावप्रकरणी छत्रपती संभाजीराजे यांचं राज्यसभेत निवेदन Chatrapati Sambhaji Raje in Rajyasabha on Bhima Koregaon violence latest update भीमा कोरेगावप्रकरणी छत्रपती संभाजीराजे यांचं राज्यसभेत निवेदन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/04131705/sambhaji-raje-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : भीमा-कोरेगाव हिंसाचाराचे आज राज्यसभेतही तीव्र पडसाद उमटले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या वतीनं हिंसाचारात दोषी असलेल्यांवर कारवाईची मागणी केली गेली. याचवेळी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही राज्यसभेत निवेदन मांडलं. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला शांततेचं आवाहन केलं आहे.
दरम्यान, सकाळी अकरा वाजता कामकाज सुरु झाल्यानंतर काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील यांना भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटेंवर कारवाईची मागणी केली.
तर शरद पवार यांनाही या प्रश्नी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, संभाजी राजे, भाजप खासदार अमर साबळे यांनीही या प्रश्नावर राज्यसभेत निषेध केला.
छत्रपती संभाजीराजे राज्यसभेत नेमकं काय म्हणाले?
मी महाराष्ट्रातील जनतेला काही सांगू इच्छितो, कारण की, मी त्या घराण्यातील आहे. शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमीत जो प्रकार घडला आहे तो निंदनीय आहे.
आम्हाला या घटनेबाबत प्रचंड दु:ख वाटतं आहे. अशी घटना इथं घडू नये असं मला वाटतं. मी एवढंच सांगू इच्छितो की, शिवाजी महाराजांनी एका समाजाला नाही तर 18 पगड जातीचे लोक आणि 12 बलुतेदार यांना एकत्र आणलं. शाहू महाराजांनी बहुजन समाजाला एकत्र आणलं. त्यामुळे अशा घटना महाराष्ट्रात घडू नयेत. यासाठी सरकारला मी विनंती करु इच्छितो की, जे समाजकंटक आहेत. या लोकांवर ताबडतोब कडक कारवाई करण्यात यावी. असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले.
VIDEO :
संबंधित बातम्या :
जे झालं ते झालं..., भीमा कोरेगावप्रकरणी शरद पवार यांचं राज्यसभेत निवेदन!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)