Chandrayaan-3 Mission: पुढील स्थानक आता थेट चंद्रच, चांद्रयान -3 चा पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु
India Moon Mission: देशातील महत्त्वकांक्षी असलेलं चांद्रयान -3 हे 5 ऑगस्ट 2023 पर्यंत चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. तसेच चांद्रयान -3 ने आपल्या सर्व कक्षा या वेळेत पूर्ण केल्या आहेत.
Chandrayaan-3 Mission: इस्रोच्या (ISRO) चांद्रयान -3 (Chandrayaan-3) च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर या यानाने आणखी एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. चांद्रयान -3 ने पृथ्वीच्या कक्षेतील सर्व फेऱ्या यशस्वीरित्या पूर्ण करत चंद्राच्या दिशेने प्रवास सरु केला आहे. तसेच जर यामधील सर्व प्रक्रिया या व्यवस्थित राहिल्या तर हे यान 5 ऑगस्ट 2023 पर्यंत हे चंद्राच्या कक्षेत प्रवेश करु शकेल. इस्रोने सोमवार (31 जुलै 2023) रोजी रात्री उशीरा ट्वीट करत चांद्रयानाविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, चांद्रयान -3 ला पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर काढण्यासाठी निर्धारित वेळेत त्याचे इंजिन चालू करण्यात आले. त्यानंतर या यानाला पुरेसा वेग देऊन त्याला चंद्राच्या दिशेने पाठवण्यात आले आहे.
इंजिनला एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत पाठवण्यासाठी वेग देण्याच्या या प्रक्रियेला वैज्ञानिक भाषेत इंजेक्शन असं म्हणतात. इस्रोचे टेलीमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क (ISTRAC) युनिट ही प्रक्रिया पार पाडते. तसेच इस्रोने चांद्रयान -3 हे 15 ऑगस्टपर्यंत चंद्रावर पोहचणार असल्याचं त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Chandrayaan-3 Mission:
— ISRO (@isro) July 31, 2023
Chandrayaan-3 completes its orbits around the Earth and heads towards the Moon.
A successful perigee-firing performed at ISTRAC, ISRO has injected the spacecraft into the translunar orbit.
Next stop: the Moon 🌖
As it arrives at the moon, the… pic.twitter.com/myofWitqdi
भारताचे चांद्रयान-3 हे यान शुक्रवार (14 जुलै) रोजी यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून चांद्रयान-3 अवकाशात झेपावले आणि देशाच्या तिसऱ्या चांद्रमोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे सर झाला. भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. भारताची चांद्रयान-तीन ही मोहीम यशस्वी ठरली तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. त्यामुळे आता चांद्रयान 3 चा पुढचा प्रवास कसा असणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.
सिंगापूरच्या सात उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण
इस्रोने रविवारी (30 जुलै) रोजी सिंगापूरच्या सातही ग्रहांचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले आहे. इस्रोने रविवारी सकाळी 6.30 वाजता या उपग्रहांचे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून केले आहे. इस्रोच्या PSLV-C56 रॉकेटद्वारे सिंगापूरच्या DS-SAR आणि इतर 6 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. इस्रोने यापूर्वी मार्चमध्ये LVM-3 रॉकेटसह ब्रिटनच्या वन-वेव्ह शी संबंधित 36 उपग्रह प्रक्षेपित केले होते.