एक्स्प्लोर
बलात्कार पीडितेच्या बाळाचा डीएनए मामाशी जुळला!
दहा वर्षांच्या बलात्कार पीडितेने ऑगस्ट महिन्यात एका मुलीला जन्म दिला होता. या प्रकरणी मुलीच्या मामाला अटक करण्यात आली होती. परंतु बाळाचा डीएनए नमुना अटक केलेल्या मामाशी जुळत नव्हता.
चंदीगड : चंदीगडमधील दहा वर्षीय बलात्कार पीडितेच्या बाळाचा पिता कोण हे आता स्पष्ट झालं आहे. मुलीचा दुसरा मामाच नवजात बाळाचा वडील असल्याचं स्पष्ट झालं आहे.
दहा वर्षांच्या बलात्कार पीडितेने ऑगस्ट महिन्यात एका मुलीला जन्म दिला होता. या प्रकरणी मुलीच्या मामाला अटक करण्यात आली होती. परंतु बाळाचा डीएनए नमुना अटक केलेल्या मामाशी जुळत नव्हता. त्यानंतर पोलिस चौकशीत मुलीने दुसऱ्या आरोपीचं नावं घेतलं, जो तिचा दुसरा मामा असल्याचं समोर आलं.
बलात्कार पीडित मुलगी गरोदर असल्याचं जुलैमध्ये समजलं होतं. पोटात दुखल्यानंतर तिचे आई-वडील तिला रुग्णालयात घेऊन गेले होते. कोर्टात मुलीचा गर्भपात करण्यासाठी याचिकाही दाखल केली होती. परंतु यामुळे मुलीच्या जीवाला धोका असल्याचं सांगत ही याचिका फेटाळण्यात आली. शहरातील सरकारी रुग्णालयात सीझेरियनद्वारे मुलीने बाळाला जन्म दिला होता.
चंदीगडमधील 10 वर्षीय बलात्कार पीडित मुलीने बाळाला जन्म दिला
बलात्कारी पीडितेच्या मुलीचा डीएनए नमुना दुसऱ्या आरोपीशी जुळत आहे. पोलिस लवकरच कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल करणार आहेत.
पहिल्यांदा आरोपी बनवलेल्या मामासोबत नवजात बाळाचा डीएनए जुळत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली होती.
दोन्ही मामांनी मुलीवर बलात्कार केला होता. दुसऱ्या मामाच्या डीएनएसोबत नवजात बाळाचा डीएनए जुळत असल्याची माहिती चंदीगडच्या वरीष्ठ पोलिस अधीक्षक निलांबरी जगदाळे यांनी दिली.
संबंधित बातमी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement