एक्स्प्लोर
Advertisement
नेहरुंमुळे एक चहावाला पंतप्रधान झाला : शशी थरुर
काँग्रेस नेते शशी थरुर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंडित नेहरुंमुळेच आज एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाला असल्याचे वक्त्व्य थरुर यांनी केले आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर आधारित एका पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. यावेळी यांनी सतत नेहरुंवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या भाजपवर टीका केली आहे. यावेळी थरुर म्हणाले की, ''माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यामुळेच आज एक चहावाला पंतप्रधान झाला आहे''.
थरुर म्हणाले की, देशातल्या कोणत्याही सामान्य व्यक्तीला पंतप्रधानपदापर्यंत पोहोचणे सोपे जाईल, नेहरुंनी अशा प्रकारे देशात संस्थात्मक रचना केली की, प्रत्येकाला त्याची स्वप्न पूर्ण करणे सोपे झाले. त्यामुळेच आज एक चहावाला पंतप्रधान झाला आहे. इथल्या लोकशाहीला पंडित नेहरुंनी आकार दिला असल्यामुळे इथली लोकशाही टिकवणे सोपे झाले आहे. अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिथल्या स्वातंत्र्याचे नायक तिथले हुकूमशहा झाले. परंतु नेहरुंनी तसे केले नाही.
नाव न घेता सोनियांची मोदींवर टीका
पुस्तकाच्या प्रकाशनानंतर झालेल्या भाषणात सोनिया गांधी यांनी मोदींवर टीका केली. त्या म्हणाल्या की, नेहरुजींसाठी चार मुल्य महत्वाची होती. लोकशाही, समाजवाद,धर्मनिरपेक्षता आणि अलिप्ततावाद, परंतु आता या मुल्यांना धोका निर्माण झाला आहे.
मोदी शिवलिंगावरील विंचू
काही दिवसांपूर्वी एका भाषणात बोलताना थरुर म्हणाले होते की, नरेंद्र मोदी म्हणजे शिवलिंगावरील विंचू आहे. मोदी एका व्यक्तीचे सरकार आहे. प्रत्येकजण त्यांच्या इशाऱ्यावर नाचतोय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement