Crude Oil : पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? कच्च्या तेलावरील टॅक्समध्ये वाढ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Crude Oil Tax Hike : केंद्र सरकारने शुक्रवारी कच्चे तेल आणि इंधनावरील विंडफॉल टॅक्समध्ये बदल केला आहे. हे नवे नियम 4 मार्चपासून लागू करण्यात आले आहेत.
Windfall Tax Changes : केंद्र सरकारने इंधन आणि कच्च्या तेलावरील (Crude Oil) करामध्ये बदल केला आहे. कच्च्या तेलावरील विंडफॉल (Windfall Tax) करामध्ये (Windfall Tax) किरकोळ वाढ केली आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी (3 मार्च) कच्चे तेल आणि इंधनावरील विंडफॉल टॅक्समध्ये बदल केला आहे. हे नवे करबदलाचे नियम शनिवारी 4 मार्चपासून लागू करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार विंडफॉल टॅक्समध्ये बदल करण्यात येतो. केंद्र सरकार दर 15 दिवसांनी विंडफॉल टॅक्सचे नवे दर जारी केले जातात.
कच्च्या तेलावरील विंडफॉल करात वाढ
केंद्र सरकारने देशातील पेट्रोलियम कंपन्यांना एकीकडे झटका दिलासा दिला आहे तर दुसरीकडे दिलासाही दिला आहे. सरकारने क्रूड ऑईल, डिझेल आणि विमान इंधनावरील (ATF - Aviation Turbine Fuel) विंडफॉल टॅक्समध्ये बदल केला आहे. एकीकडे सरकारने कच्च्या तेलावरील विंडफॉल कर वाढवला आहे, तर दुसरीकडे डिझेल आणि एअर टर्बाइन इंधन (ATF) च्या निर्यातीवरील अतिरिक्त शुल्कात कपात केली आहे.
पेट्रोलियम कंपन्यांना झटका आणि दिलासाही
केंद्र सरकारने स्थानिक पातळीवर उत्पादित कच्च्या तेलावरील विंडफॉल करात किरकोळ वाढ केली आहे. सरकारने विंडफॉल टॅक्स 4350 रुपये प्रति टन वरुन 4400 रुपये प्रति टन वाढवत किंचित केली आहे. दरम्यान डिझेलवरील विंड फॉल टॅक्समध्ये घट करण्यात आली आहे. डिझेलवरील निर्यात शुल्क 0.5 रुपये प्रति लिटर करण्यात आलं आहे. त्याचबरोबर विमान इंधनावरील (ATF) निर्यात शुल्क रद्द करण्यात आलं आहे. पेट्रोलवर कोणतंही निर्यातीवर शुल्क (Export Duty) लागणार नाही. केंद्र सरकारने लागू केलेले नवीन दर 4 मार्चपासून लागू करण्यात आले आहेत.
विंडफॉल टॅक्स म्हणजे काय?
विंडफॉल टॅक्स विशेषत: अशा कंपन्यांवर लावला जातो ज्या प्रचंड नफा कमावतात. केंद्र सरकारने पहिल्यांदाच 1 जुलै 2022 पासून पेट्रोलियम पदार्थांवर विंडफॉल टॅक्स लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सरकारने पेट्रोलबरोबरच डिझेल, एटीएफवरही हा कर लावण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.
यापूर्वी विंडफॉल टॅक्समध्ये झाले होते 'हे' बदल
यापूर्वी, भारताने 1 जुलै 2022 रोजी पेट्रोल आणि विमान इंधनावर विंडफॉल नफा कर (Windfall Profit Tax) लागू केला होता. त्यानंतर सरकारने पेट्रोलवर प्रति लिटर सहा रुपये तर डिझेलवर प्रति लिटर 13 रुपये निर्यात शुल्क लावलं होतं. त्यावेळी, सरकारने देशांतर्गत कच्च्या तेलाच्या उत्पादनावर प्रति टन 23,250 रुपये विंडफॉल नफा करही लागू केला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Petrol Diesel Price: काही राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल; तुमच्या शहरातील परिस्थिती काय?