एक्स्प्लोर

देशात आजपासून नव्या गाईडलाईन्स लागू, सिनेमागृह पू्र्ण क्षमतेने सुरु; पाहा काय बंद काय सुरु?

मार्चपासून देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर शाळा, महाविद्यालये आणि सिनेमा हॉलसह सर्व सार्वजनिक ठिकाणांवर बंदी घालण्यात आली होती. पण आता परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे बऱ्याचं गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली : देशात गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे खूप बदल दिसून आले. देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर शाळा, महाविद्यालये, सिनेमा हॉल, पब, रेस्टॉरंट्ससह इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी बंदी घालण्यात आली. पण आता परिस्थिती नियंत्रणात आली असता, केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनेनुसार आज शाळा, महाविद्यालये आणि सिनेमा घरे सुरु करण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. आजही कोरोनाचा प्रसार होताना दिसतं आहे. परंतू परिस्थिती पूर्वीच्यापेक्षा अधिक नियंत्रणाखाली आहे. देशभरात लसीकरणाला देखील सुरूवात झाली आहे.  काही दिवसांत कोरोना लसीचा पहिला डोस लाखो लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने आता मार्च 2020 पासून बंद असलेली शाळा आणि सिनेमा घरे सरु करण्यास परवानगी दिली आहे. पहिली ते दहावीपासूनचे सर्व वर्ग सुरू सरकारने दहावी ते बारावीची शाळा यापूर्वीच सुरु केल्या होत्या, परंतु आता काही राज्यामध्ये पहिली ते दहावीपर्यंतचे सर्व वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ज्याची सुरुवात आजपासून होत आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, हरियाणा, गुजरात, पंजाबपर्यंत सर्व राज्यांच्या सरकारांच्या परवानगीने आजपासून ऑफलाइन वर्ग सुरू झाले आहेत. सिनेमागृह 100 टक्के क्षमतेने सुरु माहिती व प्रसारण मंत्रालयाने 1 फेब्रुवारीपासून देशभरात 100 टक्के क्षमतेने सिनेमा हॉल सुरू करण्यास मान्यता दिली आहे. कोरोना व्हायरसच्या साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार थिएटर आणि मल्टिप्लेक्समधील लोकांच्या बसण्याची क्षमता ही एसओपीचं पालन करून सध्याच्या 50 टक्क्यांवरून 100 टक्के करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबईत आजपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु मागील 10 महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची लाईफलाईन आजपासून सर्वसामान्यांसाठी खुली झालेली आहे. मागील 10 महिन्यांपासून शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारनं मुंबई लोकल सुरु केली होती. मात्र सर्वसामान्यांना लोकलमध्ये प्रवेश देण्यात आलेला नव्हता. पण आजपासून मात्र ठराविक वेळेत सर्वसामान्यांना लोकल प्रवास करता येणार आहे. पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत, तर दुपारी 12 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत आणि रात्री 9 वाजल्यापासून ते शेवटच्या लोकलपर्यंत सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे. मात्र वेळेचं बंधन तोडल्यास मुंबईकरांवर दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी तुरुंगवास आणि 200 रुपयांचा दंडही आकारण्यात येणार आहे. आंतरराज्य प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही कोरोना काळात सर्वसामान्य जनतेला एका राज्यातून दुसर्‍या राज्यात परवानगी घ्यायला लागायची. पण आतापासून याची आवश्यकता भासणार नाही. आजपासून, आपल्याला एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाण्यासाठी कोणत्याही परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. कंटेनमेंट झोन व्यतिरिक्त आपल्याला कुठेही प्रवास करता येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
Embed widget