एक्स्प्लोर

Cinema Hall Reopening: सिनेमागृह 100 टक्के क्षमतेने सुरु होणार, गाईडलाईन्स जारी

नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार थिएटर आणि मल्टिप्लेक्समधील लोकांच्या बसण्याची क्षमता ही एसओपीचं पालन करून सध्याच्या 50 टक्क्यांवरून 100 टक्के करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : भारतातील सिनेमाप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाने 1 फेब्रुवारीपासून देशभरात 100 टक्के क्षमतेने सिनेमा हॉल सुरू करण्यास मान्यता दिली आहे. कोरोना व्हायरसच्या साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार थिएटर आणि मल्टिप्लेक्समधील लोकांच्या बसण्याची क्षमता ही एसओपीचं पालन करून सध्याच्या 50 टक्क्यांवरून 100 टक्के करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क अनिवार्य

माहिती प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या एसओपीअंतर्गत निर्जंतुकीकरण आणि कोविड नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले गेले पाहिजे. तसेच लोकांना सिनेमागृहाच्या आतमध्ये असलेल्या स्टॉलवरून पदार्थ खरेदी करता येतील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. काही निर्बंध अजूनही घातलेले आहेत, कारण आता कोविड संपुष्टात येण्याच्या मार्गावर असला तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

एसओपीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, सभागृहाच्या आवाराच्या आतमध्ये सर्व प्रकारच्या सुरक्षा विषयक उपायांची अंमलबजावणी काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. सामान्य मार्गदर्शक सूचनांमध्ये असे सांगण्यात आले आहे की, श्वसन विषयक शिष्टाचारांचे पालन करणे आवश्यक आहे, चेहऱ्यावर मास्क वापरणे, सभागृहात आणि बाहेर किमान 6 फूट आणि जास्तीत जास्त सामाजिक अंतर पाळणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी, प्रतिक्षा कक्षांमध्ये थुंकणे प्रतिबंधित असेल आणि आरोग्य सेतूचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे.

सिनेमागृहात येणाऱ्या प्रत्येकाचे प्रवेशद्वाराशी आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग झाले पाहिजे. येथील गर्दी टाळण्यासाठी रांगेत उभे राहून ही प्रक्रिया पार पाडावी. एक स्क्रीन किंवा अनेक स्क्रीन असलेल्या सिनेमागृहांमध्ये मध्यंतराच्या वेळी प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याच्या दाराजवळ गर्दी टाळण्यासाठी लोकांना रांगेने बाहेर पडता यावे, याकरिता पुरेसा वेळ दिला जाणार आहे. गर्दी टाळण्यासाठी मल्टिप्लेक्स सिनेमागृहांमध्ये सिनेमा प्रदर्शनाच्या वेळांची विभागणी केली जाईल.

शीतपेय, खाद्यपदार्थ, तिकीटे इत्यादीच्या व्यवहारासाठी संपर्क टाळण्यासाठी डिजीटल पद्धतीचा वापर करण्यास मानक कार्यपद्धती प्रोत्साहन देते. दिवसभर बॉक्स ऑफिसवर काउंटरवरची पुरेशी संख्या सुरू ठेवली जाईल आणि तिकीट खिडकीवर तिकीट विक्री चालू राहील आणि विक्री काउंटरवर गर्दी होऊ नये म्हणून आगाऊ बुकिंग करण्यासाठीही परवानगी देण्यात येईल.

ऑक्टोबरमध्ये सरकारकडून चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी

विशेष म्हणजे गेल्या वर्षी मार्चमध्ये देशात कोरोनाची साथ सुरू झाली होती. तेव्हा सिनेमा हॉल, थिएटर आणि मल्टिप्लेक्स बंद करण्यात आले होते. अनलॉक 5 अंतर्गत सरकारने ऑक्टोबरमध्ये थिएटर्स सुरु करण्यास परवानगी दिली होती. यानंतर दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांनी 50 टक्के क्षमतेने चित्रपटगृहे सुरू केली होती. त्यानंतर महाराष्ट्र आणि तमिळनाडूसारख्या राज्यांनीही चित्रपटगृह सुरू केले. चित्रपटगृहात प्रवेश करण्यापूर्वी मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता यासारखे नियम लागू केले गेले.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Speech Independence Day : युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!
युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Embed widget