एक्स्प्लोर
पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भंडाऱ्यातील मेजरसह चार जवान शहीद
जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये आज दुपारी पाकनं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. यात चार जवान शहीद झाले असून शहीदांमध्ये महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील मेजर प्रफुल्ल मोहरकर यांचाही समावेश आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये आज दुपारी पाकनं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. यात चार जवान शहीद झाले असून शहीदांमध्ये महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील मेजर प्रफुल्ल मोहरकर यांचाही समावेश आहे.
आज शनिवारी दुपारी पाककडून काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. यात महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर हे शहीद झाले आहेत. पंजाबच्या अमृतसरमधील लान्स नायक गुरमैल सिंग, आणि हरयाणातील करनाल जिल्ह्यातील शिपाई परगत सिंग हे दोन जवानही शहीद झाले आहेत, तसंच आणखी एका जवानालाही वीरमरण आलं आहे, मात्र त्याचं नाव कळू शकलेलं नाही.
या हल्ल्यानंतर चोख प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या चौक्यांवर हल्ला चढवला. दरम्यान पाकच्या या हल्ल्यात आणखी दोन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement